आजचे राशीभविष्य, ( गुरुवार , २३ फेब्रुवारी २०२३ )

Spread the love

जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष :-

शुभ रंग:मोतिया, शुभ अंक : ७


आज काटकसरी वृत्तीस थोडा लगाम घालून काही अत्यावश्यक खर्च करावेच लागतील. घरात थोरांच्या होला हो करून वाद आवरते घ्या. प्रवासात तब्येत जपा.

वृषभ :-

शुभ रंग:हिरवा, शुभ अंक : ३


एखाद्या नव्या उपक्रमाची सुरवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. नोकरदारांच्या रास्त मागण्या वरीष्ठ मान्य करतील. वास्तू वाहन खरेदीसाठी कर्जमंजूर होईल.

मिथुन :-

शुभ रंग:गुलाबी, शुभ अंक : २


तुमच्या कार्यक्षेत्रातील अती व्यस्ततेमुळे आज तुम्हाला कुटुंबियांची नाराजी पत्करावी लागेल. नोकरदारांना वरीष्ठांच्या मागेपुढे करावेच लागेल. व्यस्त दिवस.

कर्क :-

शुभ रंग: मरून, शुभ अंक : ४


तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाची साथ लाभेल. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. नोकरीत वरीष्ठांची मर्जी राहील. ज्येष्ठ मंडळी सत्संगात रमतील.

सिंह :-

शुभ रंग: स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ५
आज जे काही कराल ते तब्येतीस जपून करा. आपल्या कुवती बाहेर जबाबदाऱ्या स्विकारूच नका. गोडबोल्या मंडळींपासून लांबच रहा. जोडीदार सांगेल तेच योग्य.

कन्या :-

शुभ रंग:निळा, शुभ अंक : ९


उद्योगधंद्यातील वाढत्या स्पर्धेस समर्थपणे तोंड द्याल. अडचणीत जोडीदाराची खंबीर साथ राहील. आज तुम्ही एखादा विवाह जुळवण्यास यशस्वी मध्यस्ती कराल.

तूळ :-

शुभ रंग:आकाशी, शुभ अंक : २


नोकरदारांवर कामाचा वाढता ताण राहील. ध्येय साध्य करण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागतील. आज जोडीदार जे म्हणेल त्याला हो म्हणणे हिताचे राहील.

वृश्चिक :-

शुभ रंग:भगवा, शुभ अंक : १


सौदर्य प्रसाधनंचे व्यवसाय चांगले चालतील. कलाक्रिडा क्षेत्रातील मंडळी उत्कृष्ट कामगिरी करतील. उच्चशिक्षित मंडळींच्या महत्वाकांक्षा वाढतील. प्रकृती उत्तम राहील.

धनू :-

शुभ रंग:केशरी, शुभ अंक : ६


आज गृहसौख्याचा दिवस असून कौटुंबिक सदस्यात खेळीमेळीचे वातावरण राहील. अत्यंत सकारात्मकतेने दिवसाची सुरवात कराल. आज गरजूंना मदत कराल.

मकर :-

शुभ रंग:जांभळा, शुभ अंक : ८


कार्यक्षेत्रात आज विरोधकांशीही गोड बोलून आपला स्वार्थ साधून घ्यावा लागेल. आज बेरोजगारांना नोकरीचे कॉल्स येतील. आज आलेली कुठलीही संधी सोडू नका.

कुंभ :-

शुभ रंग:पांढरा, शुभ अंक : ४


आज तुमची आर्थिक बाजू भक्कम राहील. एखाद्या महत्वाच्या बातमीने आजच्या दिवसाची सुरवात होईल. आज आपल्या जोडीदाराचे मन जपण्याचा प्रयत्न कराल.

मीन :-

शुभ रंग:लाल, शुभ अंक : ५


आज कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीचा आलेख उंचावेल. नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्विकाराल. जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी तुमच्या हातून होईल.

हेही वाचलंत का ?

टीम झुंजार