जळगाव : चोपडा शहरात दोन आणि अमळनेर येथे एक अशा तीन मोटार सायकली चोरल्याची कबुली देणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. राजेश श्रीराम बारेला रा.मोहनपडावा ता. वरला जि.बडवाणी म.प्र.असे चोपडा येथून त्याच्या ताब्यातील मोटार सायकलसह अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
अटकेतील राजेश बारला याने दिलेल्या कबुलीनुसार चोपडा आणि अमळनेर पोलिस स्टेशनला दाखल गुन्हे उघडकीस आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील पोहेकॉ संदिप रमेश पाटील, पोना. प्रविण जनार्दन मांडोळे, पोना. परेश प्रकाश महाजन, पोकॉ. दिपककुमार फुलचंद शिंदे, चापोकॉ. प्रमोद शिवाजी ठाकूर आदींनी या तापासकामी सहभाग घेतला.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






