जळगाव : – राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. त्यातच जळगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या मित्राच्याच २० वर्षीय पत्नीवर मित्राने विनभंग केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. “तू जर माझ्याची प्रेमसंबंध ठेवले नाही तर तू तुझा आणि तुझ्या पतीचा विचार करून ठेव”, अशी धमकी देवून पतीच्याच मित्राने २० वर्षीय विवाहितेला त्याच्या घरी बोलवून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बुधवारी रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून विनयभंग करणाऱ्या पतीच्या ३० वर्षीय मित्रास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील रामानंदनगर परिसरातील एका भागात २० वर्षीय विवाहिता ही पती व सासू-सासऱ्यांसह वास्तव्यास आहे. अधून-मधून पतीसोबत त्यांचा मित्र हा घरी येत होता. दीड महिन्यापासून पतीचा मित्र हा फोन करून विवाहितेशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. तसेच विवाहितेसोबत वेळोवेळी वारंवार जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता आणि विवाहितेला बळजबरीने प्रेमसंबंध ठेवण्यास भाग पाडत होता.
मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पतीच्या मित्राने विवाहितेला फोन करून “तुझ्याशी अर्जंट काम आहे, तू लवकर माझ्या घरी ये”, असे त्याने सांगितले. विश्वास ठेवून विवाहिता त्या मित्राच्या घरी गेल्यावर त्याने विवाहितेचा हात पकडून विनयभंग केला. नंतर “तू माझ्याशी प्रेमसंबंध ठेव”, असे म्हणू लागला. विवाहितेने नकार दिल्यावर त्याने “तू जर माझ्याची प्रेमसंबंध ठेवले नाही, तर तुझा आणि तुझ्या पतीचा विचार करून ठेव”, असे म्हणत विवाहितेसह तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकारानंतर भेदरलेल्या विवाहितेने घर गाठले व संपूर्ण हकीकत आपल्या पतीला सांगितली. त्यानंतर बुधवारी दुपारी ३ वाजता पतीसोबत रामानंदनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार रामानंदनगर पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याप्रकरणी पतीच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पतीसोबत घरी येणाऱ्या मित्रानेच असा प्रकार केल्याने या घटनेने खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार निलेश पाटील हे करत आहेत.
हे वाचलंत का ?
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४