माध्यमिक पतपेढीची प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारी नूतन संचालक मंडळाची: शिवाजी शिंदे

Spread the love

पाचोरा – येथील अखिल भारतीय मराठा महासंघ पाचोरा व महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद जळगाव यांचे तर्फे जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीच्या संचालक पदी पाचोरा तालुका सर्वसाधारण गटातून विजयी झालेले नवनिर्वाचित उमेदवार भावेश आहीरराव यांचा सत्कार काल ता.24 फेब्रुवारी, शुक्रवार रोजी करण्यात आला. मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी यावेळी बोलताना म्हटले की, “जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीची प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारी नूतन संचालक मंडळाची आहे. संस्थेची प्रतिमा, सभासदांचे हित आणि अर्थकारणातील विश्वासनीयता जपण्यासाठी पाचोरा तालुक्यातून निवडून दिलेले प्रतिनिधी भावेश अहिरराव हे सतत प्रयत्नशील राहतील,” असा विश्वास यावेळी शिवाजी शिंदे यांनी व्यक्त केला.

मराठा महासंघ व शिक्षक परिषदेच्या संयुक्त कार्यालयात हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रा. शिवाजी शिंदे, माणिक राजे ट्रस्टचे विश्वस्त प्रा. रवींद्र चव्हाण, सत्कारार्थी भावेश अहिरराव, शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी आबाजी पाटील मंचावर उपस्थित होते भावेश अहिराव यांच्या यशस्वी निवडीबद्दल कला शिक्षक योगेश पाटील (वडजी), विनोद पाटील सर (निंभोरी) नानासाहेब पाटील (खडकदेवळा), राकेश गोकुळ पाटील (पाचोरा) यांनी गौरव उद्गार काढले. माध्यमिक पतपेढीचे नवनिर्वाचित संचालक भावेश अहिराव यांना यावेळी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना भावेश अहिरराव यांनी सर्व मतदार सभासदांचे व हितचकांचे ऋण व्यक्त केले. सभासदांच्या हितासाठी नवनवीन योजना व दैनंदिन शालेय कामकाजासाठी कामकाजात सुलभता आणण्यासाठी तांत्रिक सहकार्य करण्याचे अभिवचन उपस्थितांना दिले. चंद्रकांत पाटील सर (खडकदेवळा) यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले कृष्णराव पाटील सर (खेडगाव नंदीचे) यांनी आभार मानले.

या सत्कार समारंभ प्रसंगी पत्रकार गणेश शिंदे, प्रा. पी. आर. पाटील (तावरे विद्यालय), अनिल म्हसदे (लोहटार), किरण अहिरराव (लोहटार), यशवंत गांगुर्डे (सामनेर) जयदीप पाटील (पाचोरा) सुनील गुजर (खडकदेवळा) संदीप सोनवणे (नवजीवन विद्यालय पाचोरा), संदीप पाटील (भातखंडे बुद्रुक), संभाजी देसले (खडकदेवळा) मनोज जाधव (वडगाव आंबे) नरेंद्र पाटील सर (अंजनविहिरे), ज्ञानेश्वर वाघ (लोहटार) ज्ञानेश्वर पवार (नगरदेवळा) प्रमोद चौधरी (मिठाबाई शाळा पाचोरा), यासह अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व हितचिंतक तसेच मराठा महासंघ व महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते

हे पण वाचा

टीम झुंजार