‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’अंतर्गत प्रभाग क्र.12 मध्ये‘कचरामुक्त कॉलनी’ उपक्रमांतर्गत सहभागी नागरिकांचा महापालिकेतर्फे रोटरी भवनात यथोचित सन्मान.

Spread the love

जळगाव: जळगाव शहर महापालिकेतर्फे ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ अंतर्गत शहरातील प्रभाग क्र. 12 मध्ये ‘कचरामुक्त कॉलनी’ या उपक्रमांतर्गत आज मंगळवार,दि.1 फेब्रुवारी 2022 रोजी मायादेवी नगरातील रोटरी भवनात परिसरातील नागरिकांचा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.

यावेळी त्यांनी महापालिकेच्या ‘कचरामुक्त कॉलनी’ उपक्रमास भरभरून प्रतिसाद देत शहरातील 28 कॉलन्यांतील नागरिकांनी सकारात्मकतेने आपला परिसर कचरामुक्त केल्याची माहिती उपस्थितांना दिली. नगरसेविका सौ.उज्ज्वला बेंडाळे, सौ.गायत्री राणे, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सचिव श्री.विनोद बियाणी, महापालिका उपायुक्त श्री.श्याम गोसावी, रोटरी वेस्टचे पदाधिकारी व शहर समन्वयक श्री. महेंद्र पवार, महापालिकेचे आरोग्य निरीक्षक श्री. उल्हास इंगळे, प्रमुख श्री.केतन हातागळे व महापालिकेचे कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.

टीम झुंजार