पारोळा l प्रतिनिधी
पारोळा :- कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने राज्यात कापूस कोंडी झाली आहे. शेतकऱ्याच्या कापसाला 13 हजार रुपये भाव मिळावा या मागणीसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या वतीने पारोळ्यात आज मोर्चा काढून तहसीलदार अनिल गावंदे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शेतकरी संघटनेच्या वतीने
बाजारपेठेतील नगरपालिका चौक, शिरूडे प्रोव्हिजन, पीर दरवाजा, कजगाव चौफुली वरून हा मोर्चा पोलीस ठाण्यात दाखल झाला. यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार अनिल गवांदे यांना शेती व शेतकरी संदर्भात विविध 13 मागण्यांचे निवेदन अध्यक्ष सुनील देवरे सह पदाधिकाऱ्यांनी दिले. संघटनेकडून यावेळी घोषणा देण्यात आल्या. पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला.


रस्ता रोकोचे मोर्चात रूपांतर
महाराष्ट्र शेतकरी संघटने वतीने आज विविध मागण्यांसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते. परंतु पोलिसांची सूचना आणि बाजार दिवस पाहता. हा रास्ता रोकोचे मोर्चात रूपांतर करून संघटने कडून शांततेत निवेदन देण्यात आले.यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनावर सुनील प्रकश देवरे अध्यक्ष महाराष्ट्र शेतकरी संघटना यांचेसह अनेक शेतकऱ्याच्या सह्या आहेत.
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम