सर्वसामान्यांच्या भ्रमनिरास करणारा अर्थसंकल्प : गुलाबराव वाघ

Spread the love

*जळगाव दिनांक २ ( प्रतिनिधी ) : आज सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा देणारी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नसून आधीच्या योजनांनाच रिपीट करण्यात आल्या आहेत ,सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कष्टकरी जनतेला दिलासा मिळेल अशी एकही तरतूदअर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. फक्त जनतेच्या भ्रम निरास करणारा अर्थ संकल्प आहे, शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी कोणतीच भरीव निधी दिलेली दिसुन येत नाही. अशी तिखट प्रतिक्रिया शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी प्रतिनिधी शी बोलताना व्यक्त केली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातील तरतुदींवर आणि एकंदरीतच या अर्थसंकल्पावर ना. गुलाबराव वाघ यांनी कडाडून टीका केली आहे. ते म्हणाले की, देशात सध्या नैराश्याचे वातावरण असून शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य कामगार, औद्योगीक आणि सेवा क्षेत्रातील कर्मचारी हे अडचणीत आलेले आहेत. अर्थव्यवस्थेचा गाडा अद्यापही रूळावर आलेला नसल्यामुळे बजेटमध्ये काही तरी ठोस तरतुदी होतील अशी अपेक्षात असतांना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मात्र केवळ आभासी आणि आकडेवारींचा खेळ करणारा बजेट सादर केला असल्याची टीका गुलाबराव वाघ यांनी केली आहे,
या अर्थ संकल्पात शेतकरी, शेतमजूर यांची घोर निराशा केली आहे,हा सर्वसामान्यांना मारक असा अर्थ संकल्प आहे.

टीम झुंजार