जागतिक महिला दिनानिमित्त एरंडोल नपा चा पैठणी सोडत कार्यक्रम

Spread the love


एरंडोल :- एरंडोल नगर परिषदेतर्फे स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत स्मार्ट गृहिणी स्पर्धा 2023 माहे जानेवारी मध्ये आयोजित करण्यात आली होती. दैनंदिन घरगुती घनकचरा ओला व सुका असा विलगिकरण करून देणाऱ्या नागरीकांनाच 30 दिवस कूपन वाटप घंटागाडी कर्मचारी व नगर पालिका कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आले होते. सदर स्पर्धेला शहरातील विविध प्रभागातून महिलांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला.त्यामुळे शहरातील ओला सुका कचरा विलगिकरणाचे प्रमाण वाढले होते.परिणामी नगर पालिकेमार्फत तयार करण्यात येणाऱ्या कंपोस्ट खतात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

सहभाग घेतलेल्या एकूण 1700 महिलांमधून सोडत म्हणजेच लकी ड्रॉ द्वारे निवड करून एकूण 30 पैठणी वाटप मा. आबासो चिमणराव पाटील आमदार एरंडोल पारोळा मतदार संघ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे किशोर दादा काळकर व व्याख्याते तथा कीर्तनकार अविनाश भारती राहतील. कार्यक्रमाचे स्थळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक भव्य 100 फूट तिरंगा जवळ वेळ दुपारी 04 वाजता. सर्व नागरिकांनी वेळेवर उपस्थित रहावे तसेच सहभाग घेतलेल्यांनी आपले आधार कार्ड सोबत ठेवावे असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार