पाचोरा प्रतिनिधी= असे म्हणतात मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीचा अर्थच असा आहे की बालकाच्या अंगभूत असलेले सूक्त गुण तो लहानपणापासूनच कळत नकळत प्रदर्शित करत जातो आणि असे कलागुण ओळखून त्यांचा योग्य दिशेने विकास केला तर प्रत्येक बालक भविष्यामध्ये निश्चितच यशस्वी होतो. आमचे पत्रकार मित्र दैनिक नजरकैदचे विभागीय संपादक, राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांचे चिरंजीव धैरेश (रुद्र) रायसाकडा हे पाचोरा येथील गिरणी शिक्षण संस्था संचलित शिंदे इंटरनॅशनल स्कूल मध्ये
सीनियर केजी या इयत्तेत शिक्षण घेत आहेत अवघ्या पाच वर्षाच्या वयात धैर्येशने आपल्या अंगभूत कलागुणांचे प्रकटीकरण केलेले आहे यंदाच्या पाचोरा येथील भव्य दिव्य अशा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने त्याने साकारलेले छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिरूप अत्यंत देखणे व उपदार ठरले . विद्यालयातील सर्व वेशभूषांमधून अत्यंत हुबेहूब व साजेशे प्रति रूप साकारणाऱ्या धैर्यश रायसाकडा याला गोल्ड मेडल व प्रशस्तीपत्र देऊन शिंदे इंटरनॅशनल स्कूल ने गौरव केला
तसेच एसबीआय लाइफ यांचे तर्फे घेण्यात आलेल्या विविध रंग स्पर्धेत सुद्धा त्याने उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रशस्तीपत्रकाची थाप पाठीवर मिळवली अवघ्या पाच वर्षात त्याने सुरू केलेली ही वाटचाल निश्चितच एका मोठ्या ध्येयाकडे जात असल्याचे संकेत पालकांना मिळाले आहेत त्याच्या या यशाबद्दल मनस्वी अभिनंदन व त्याच्या कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी विद्यालयाने त्याला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल विद्यालयाचे सुद्धा मनस्वी आभार त्याच्या या अल्पशा परंतु प्रेरणादायी यशासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे. युवा नेते अमोल भाऊ शिंदे. संस्थेचे सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे तसेच शाळेचे प्राचार्य डॉक्टर विजय पाटील विद्यालयातील कला व क्रीडा शिक्षकांचे योगदान लाभले
हे देखील वाचा
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.