दोन सराईत गुन्हेगारांना 2 वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Spread the love

जळगाव :- जिल्हयांत टोळीने गुन्हे करणारे दोन इसमांविरुध्द मुं.पो. का. क. ५५ प्रमाणे हद्दपार प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक सो. जळगाव यांचे कडेस आल्यानंतर सदर प्रस्तावाची उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव उपविभाग यांचे कडून चौकशी करुन ते खरोखर जिल्हयांतुन हद्दपार करण्याचे किंवा वारंवार गुन्हे करण्याचे सवयी आहे असे चौकशीत निष्पन्न झाल्याने त्यांना जळगांव जिल्हयातुन दोन वर्षासाठी हददपार करण्यात आले आहे.

जळगाव शहर पो.स्टे. कडील हद्दपार प्रस्ताव क्र. ०२/२०२२ प्रमाणे १) संदिप भास्कर ढोके वय २४ रा. गेंदालाल मिल, जळगाव टोळी प्रमुख, ०२) विशाल वाल्मिक जाधव वय २३ रा. गेंदालाल मिल, जळगाव टोळी सदस्य यांचे विरुध्द जळगाव शहर पो.स्टे. ला (१) गु.र.नं. ११५/२०१६ भादंवि क. ३९४,३४ प्रमाणे, (२) गु.र.नं. १४९ / २०१६ भादंवि क. ४५४, ४५७, ३८०, ३४ (३) गु.र.नं. २८ / २०१८ भादंवि कलम ३७९, ४२७,३४, (४) गुरन ९९ / २०२१ भादंवि कलम ४५४, ४५७, ३८०, (५) गुरन ३१२ / २०२१ भांदवि कलम ४५४, ४५७, ३८०, (६) गु.र.नं. ३१३ / २०२१ भादंवि कलम ४५४, ४५७, ३८०, (७) गुरन १९७ / २०१९ भादंवि कलम ३२४,५०४,५०६,३४, प्रमाणे गुन्हे दाखल आहे.

सदर सामनेवाला यांनी सदरचे गुन्हे टोळीने केलेले आहेत. सदर हद्दपार प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव उपविभाग यांनी केलेली आहे. सदर सामनेवाले यांनी टोळीने राहुन जळगाव शहरात व परिसरात दहशत पसरवितात. सदर टोळीची नागरिकांमध्ये भिती निर्माण होऊन नागरिकांचे जिवीतास व जंगम मालमत्तेस धोका निर्माण झालेला आहे. त्यांना जळगाव शहरात शांतता ठेवण्याबाबत त्यांचे विरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्यांचे वर्तनात सुधारणा झालेली नाही.

त्यांचे विरुध्द गुन्हे दाखल असुन त्यांच्यामुळे जनतेच्या जिवीताला, मालमत्तेस मोठा धोका निर्माण झालेला आहे असे चौकशीत निष्पन्न झालेले आहे. त्यामुळे वरील सामनेवाले यांचे वर्तनात सुधारणा व्हावी करीता मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक सो. जळगाव यांच्या आदेशाने सामनेवाले यांना २ वर्षा करीता जळगाव जिल्हयांच्या हद्दीतुन हद्दपार करण्यात आलेले आहे असा आदेश स्थानिक गुन्हे शाखा जळगांव वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी दिला आहे.

हे देखील वाचा

टीम झुंजार