गतवर्षीच्या उन्हाळ्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे कड़क निर्बंध लागू होते . त्यामुळे अनेकांना घरचे मंगलकार्य मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत आटोपते घ्यावे लागले . दिवाळीच्या काळात मात्र शेकडोंच्या उपस्थितीत तथा धूमधडाक्यात लग्नकार्य पार पडले . आता पुन्हा ओमीक्रोन ह्या कोरोनाच्या संकटाने तोंड वर काढण्यासोबतच लग्नकार्यात 200 पेक्षा अधिक लोकांची उपस्थिती असता कामा नये ,असे सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत . त्यामुळे २२ जानेवारी ते २७ एप्रिल दरम्यान २८ शुभमुहूर्त असूनही लग्नकार्य धूमधडाक्यात लावता येणे अशक्य झाले असतांना सुध्दा शहरासह तालुक्यात लग्न समारंभात मोठ्या संख्येने पाहुणे मंडळींची तोबा गर्दी होत आहे.
त्यामुळे अनेकांचे जीव धोक्यात घालून कर्तव्य पार पाडली जात आहे. स्वतःची इमेज प्रदर्शित करुन बडेजावचा नाद हा खुळा ठरणार आहे. गतवर्षीच्या उन्हाळ्यात ऐन लग्नसोहळ्यांचा हंगाम असताना मार्च , एप्रिल , मे आणि जून या महिन्यांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने जिल्हाभरात हाहाकार माजविला होता. आत्ता पुन्हां त्याच परिस्थितीकडे वाटचाल होताना दिसत आहे. यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून लग्नकार्यांमध्ये होणाऱ्या गर्दीला आवर घालण्यासाठी प्रशासनाकडून कडक निर्बंध लादण्यात आले पाहिजे. प्रत्येक लग्न कार्यस्थळी आरोग्य विभागा कडून तपासणी पथक नेमणे आवश्यक आहे. त्यात बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या पाहुण्यांची नोंद घेणे आवश्यक आहे. तालुक्यातील अनेक लग्नकार्यांची साधी परवानगीही घेण्याची तसदी नागरिक घेत नाही.
कारण परवानगी न घेणाऱ्या लोकांना कार्य मोठ्या धुमधडाक्यात अनेक नेत्यांच्या व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडायचे असते. शहरातील तौबा गर्दी होणाऱ्या अनेक लग्न कार्यामध्ये तालुक्यातील अनेक अधिकारी बेजाबदारपणे हजेरी लावतांना दिसत आहेत. अश्या प्रकारांमुळे सर्वसामाण्यांचा जीव धोक्यात येणार आहेत. ह्या साठी आत्ता इनसिडेंट कमांडर यांनी आत्तातरी प्रत्येक लग्नसमारंभावर नजर ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा दररोज कोरोना रुग्णाची संख्या कशी काय वाढत आहे. हे कळणे मिश्किलीचे ठरेल.