जळगाव: सध्या महाराष्ट्रात अपघातच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव जिल्ह्यात एक अपघात झाला आहे. अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले. शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत बैलजोडीचा करूण अंत, जळगावातील शेतकऱ्याने सर्वस्व गमावलं. जळगाव-कानळदा रोडवर भीषण अपघात.
जळगाव ते कानळदारोड वरवर एका शेतकऱ्याच्या रोडवर उभ्या खतांच्या बैलगाडीला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने बैलगाडीला जुंपलेले दोन बैल जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक हा ट्रॅक्टर सोडून पसार झाला होता. शेतकरी खाते घेण्यासाठी बैलगाडीवरून खाली उतरला क्षणातच हा अपघात झाला. दैव बलवत्तर म्हणून या घटनेत सुदैवाने शेतकरी वाचला अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.
जळगाव कानळदा रोडच्या बाजूला असलेल्या लक्ष्मी जिनिंग जवळ दगडू राजाराम धनगर रा. आव्हाने ता. जि.जळगाव यांचे शेत आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजता दगडू धनगर हे मुलगा रावसाहेब धनगर यांच्यासोबत शेतातील पिकांना खत देण्यासाठी बैलगाडीने रासायनिक खते घेऊन शेतात गेले. त्यावेळी त्यांनी शेताच्या बाजूला असलेल्या रोडवर बैलगाडी उभी करून रासायनिक खते शेतात डोक्यावरून नेत होते. दरम्यान रोडवर उभी असलेली बैलगाडीला जळगावकडून गिरणा नदीत जाणाऱ्या भरधाव वाळूच्या रिकाम्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला. तर बैलगाडी पूर्णपणे चक्काचूर होऊन मोठे नुकसान झाले आहे. बैलगाडीमधील खते रस्त्यावर पडून मोठे नुकसान झाले आहे. तसेच ट्रॅक्टर देखील पलटी होऊन बाजूला पडले.
हा अपघात एवढा भीषण होता की, त्यांच्या आवाजाने नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. अपघात घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेतली व मदतकार्य सुरू केले. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाला होता. बैलगाडी उभे करून बैलगाडी मध्ये ठेवलेली खते उतरण्याचं काम शेतकरी दगडु धनगर हे करत होते. खत उतरवले आणि ते ठेवण्यासाठी गेले, तेवढ्यात ही घटना घडली. सुदैवाने या ट्रॅक्टरजवळ शेतकरी दगडू धनगर व रावसाहेब धनगर नव्हते. नाहीतर त्यांचा देखील दुर्दैवी होवून मोठी दुर्घटना घडली असती, अशी सुद्धा घटनास्थळी नागरिकांमध्ये चर्चा होती. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती तर अपघातामुळे वाहतुकीचा देखील बराच वेळ खोळंबा झाला होता. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
हे वाचलंत का ?
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४