चाळीसगाव :- व्यापाऱ्याच्या डोळ्यांदेखत सुमारे दोनशे क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. यात त्याचे सुमारे १० ते १५ लाखांचे नुकसान झाले आहे. चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथील एका कापसाच्या गोडाऊनला अचानक आग लागल्याने सुमारे दोनशे क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची थरारक घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. अंदाजे दहा ते पंधरा लाखांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
मालेगाव तालुक्यातील कळवाडी येथील व्यापारी दादा वाणी यांच्या मालकीचे हे कापूस असल्याचे सांगितले जात असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आग एवढी भीषण होती की, क्षणार्धात होतेच नव्हते झाले. या घटनेत गोडाऊनमधील तब्बल दोनशे क्विंटल कापूस जळून खाक झाले आहे.
डोळ्यांदेखत पांढरे सोने खाक झाल्याने तब्बल १० ते १५ लाख रुपयांचा नुकसान वाणी यांना झाले आहे. तत्पूर्वी सदर घटनेची माहिती मेहूणबारे पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड यांना मिळताच लागलीच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे, शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत याप्रकरणी पंचनामा करुन पोलिसात नोंद करण्याचे काम सुरु होत.
पहा व्हिडिओ :
चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथे गिरणा नदीच्या पूलाचे काम सुर असताना गज कापताना ठिणगी पडली व यापासून काही अंतरावर असलेल्या कापसाच्या गोडाउनमध्ये पडली. यात काही क्षणात ४०० क्विंटल कापूस जळून खाक झाला आहे. ३५ ते ४० लाखांच्या नुकसानाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जगदीश शरद वाणी रा. कळवाडी यांचे हे कापसाचे गोडावून आहे. काही दिवसांपूर्वीच कापसाचे गोडावून मालक जगदीश वाणी यांची १२ लाख रुपये असलेली बॅग चोरट्यांनी लांबविली आहे, आता पुन्हा त्यातच ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाल्याने वाणी यांना मोठा धक्का बसला आहे.
चाळीसगाव अग्निशमन बंब तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने ही आग आटोक्यात आली, मेहुणबारे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक प्रकाश चव्हाण, मोहन सोनवणे, कुशल शिंपी, तलाठी निलेश अहिरे यांनी घटनास्थळी पोहचत पंचनामा केला.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






