पारोळा l प्रतिनिधी
पारोळा :- गेल्या 30-35 वर्षापासून तालुक्यातील भामरखेडा प्रकल्प हा निधी अभावी रखडून पडला होता. त्या प्रकल्पाला 30 कोटी 21 लक्ष रुपये मंजूर करवून आणले आहेत.त्यामुळे तो प्रकल्प आता मार्गी लागला आहे. तालुक्यातील जनतेसाठी आत्यांत महत्वाचा हा प्रश्न सुटल्यामुळे माझी स्वतःची आमदारकी सार्थकी लागल्याचे लोकबोल वरून समाधान वाटत आहे. असे प्रतिपादन आमदार चिमणराव पाटील यांनी व्यक्त केले.
भामरखेडा ता पारोळा या लघु योजनेचे भूमिपूजन काल तारीख चार रोजी सायंकाळी सहा वाजता आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले . त्याप्रसंगी ते बोलत होते.
माजी चेअरमन चतुर पाटील, डॉ. दिनकर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अमोल पाटील, तालुका प्रमुख मधुकर पाटील, पोपटराव नाईक,दगडू पाटील,डॉ राजेंद्र पाटील, एरंडोलचे शालिक गायकवाड, आनंदा चौधरी आदी प्रमुख म्हणून यावेळी उपस्थित होते. आमदार पाटील पुढे म्हणाले की, शिवसेना गट बदल केल्याने आज मतदारसंघाला मोठ्या प्रमाणात विकास निधी हा मिळत आहे. जवळपास आतापर्यंत एक हजार कोटी रुपयांचा कामांना मान्यता मिळाली आहे. तर महिन्याभरात भामरखेडा प्रकल्प, पारोळा, एरंडोल नगरपालिका पाणीपुरवठा योजना, यांना सव्वाशे कोटी रुपयांची निधी मान्यता मिळाली आहे.

मतदार संघाच्या विकासासाठीच गट बदल करण्याचा घेतलेला निर्णय देखील अचूक ठरला आहे. अजून दीड वर्षा सत्ता ताब्यात आहे. या काळात मतदारसंघातील नगरपालिका, जिल्हा परिषद,पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती या सारख्या संस्था ताब्यात मिळाल्यास मोठ्या प्रमाणात शासनाकडून निधी आणून मतदारसंघाचा भूतो ना भविष्य असा विकास करून काया पालटचा प्रयत्न मी करणार आहे. स्थानिक संस्था ताब्यात राहिली की विकास कामे करायला अधिक सोपे जाते. जनतेने देखील विकास करण्याऱ्याच्या पाठीमागे उभे राहून आम्हाला सत्तेचा कौल द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो.दरम्यान येणाऱ्या काळात मी शेती आणि शेतकरी यांचा विकासाला,प्रगतीला सर्वाधिक महत्व देणार आहे. शेती सिंचनासाठी शक्य त्याठिकाणी पाणी अडविण्यासाठी मला साईड सांगा त्या त्या ठिकाणी नाला बांध निर्माण करू सिंचन क्षेत्रात वाढ करू असे आश्वासन त्यानी यावेळी दिले आहे.

राजकारणाचा शेवटचा टप्पा
आमदार चिमणराव पाटील हे गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षा पासून राजकारणात सक्रिय आहेत. वयोमानानुसार ते आता स्वतः निवडणूक लढविणार नाहीत. त्यांचा राजकीय वारसा मुलगा अमोल चिमणराव पाटील यांच्याकडे ते सोपविणार आहेत. तसे सुतावाच त्यांनी या कार्यक्रमात बोलताना ‘आपला राजकारणाचा हा शेवटचा टप्पा’ असल्याचे जाहीर करून दिले आहेत.
भामरखेडा लघु पाटबंधारे योजना
नाल्याचे नाव हिरवी नदी
सिंचन क्षमता 207 हेक्टर
पाणी साठा 1777.21 स घ मी
धरणाची लांबी1620 मीटर
भूसंपादन क्षेत्र 55.54 हेक्टर (खाजगी जमीन)
योजना किंमत एकूण 30. 21 कोटी
कामासाठी लागणारी किंमत 12.58 कोटी
भूसंपादनासाठी किंमत 12.22 कोटी
हे देखील वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम