पाचोरा (प्रा अमोल झेरवाल)
5 मार्च 2023 रोजी सायंकाळी 5 वा झेरवाल अकॅडमी पाचोरा येथे स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. झेरवाल अकॅडमी पाचोरा व झेरवाल प्री स्कूल सेंटर पाचोरा यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन पाचोरा तालुक्याचे तहसीलदार कैलास चावडे यांनी केले व कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भौतिकशास्त्र विषयाचे जेष्ठ शिक्षक व लेखक प्रा. राजेंद्र चिंचोले सर यांनी भूषविले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पाचोरा डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दिनेश सोनार, गुरुकुल इंग्लिश मीडियम चे मुख्याध्यापक प्रेम शामनानी सर, नवजीवन शाळेचे विज्ञानाचे शिक्षक व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी रवींद्र चौधरी सर, श्री गोविंद समर्थ हॉस्पिटलचे डॉ. मुकेश तेली, एस बी बिल्डरचे नितीन पाटील, भाजपा युवामोर्चा पाचोरा तालुका अध्यक्ष मुकेश पाटील, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष समाधान मुळे, उद्योजक विशाल नेवे, जनशक्ती वृत्तपत्राचे पत्रकार विजय पाटील, ज्येष्ठ शिक्षक प्रभाकर सिनकर सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पाचोरा तालुक्याचे तहसीलदार कैलास चावडे यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भौतिकशास्त्राचे ज्येष्ठ शिक्षक व लेखक प्रा राजेंद्र चिंचोले सर यांनी भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली व भारतीय परंपरेनुसार आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. पाचोरा तालुक्याचे तहसीलदार कैलास चावडे यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत खेळही महत्त्वाचे असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांसोबत आई-वडिलांनी वेळ घालवायला हवा तसेच त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना चांगल्या संधी सोयी उपलब्ध करून द्यायला हव्या असे मत त्यांनी व्यक्त केले. यानंतर सौ प्रतिभा चावडे यांनी आपल्या मनोगतामध्ये महिलांना इतर मनोरंजनाच्या सोयी उपलब्ध नसल्यामुळे महिला ह्या मालिका बघतात मात्र तरीसुद्धा महिलांचे प्रमाण शिक्षण क्षेत्रामध्ये उच्च स्थानी असल्याचे त्यांनी सांगितले. आई आणि वडिलांनी दोघांनी मिळून आपल्या विद्यार्थ्यांच्या संगोपनाकडे जर लक्ष दिले तर निश्चितच मुलांचा विकास होईल असे त्यांनी सांगितले.
यानंतर नवजीवन माध्यमिक विद्यालयाचे विज्ञानाचे शिक्षक व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी रवींद्र चौधरी सर यांनी विज्ञानाचे प्रयोग सादर केले. बुवाबाजी कशी आपल्या मनामध्ये घर करते व या बुवाबाजीचे प्रयोग ही बुवा लोक कसे सादर करत असतात, यामागे विज्ञान काय? हे त्यांनी सर्व श्रोत्यांना समजावून सांगितले. यानंतर 27 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या विज्ञान प्रदर्शनाच्या निकाल जाहीर करण्यात आला.यामध्ये माध्यमिक गटातून
प्रथम क्रमांक
स्वयं भावसार, कुणाल चांगरे तावरे उच्च माध्यमिक विद्यालय (इलेक्ट्रिक स्पायडर)
द्वितीय क्रमांक
Hologram ( Std 9th) कुणाल विकास पाटील, प्रमोद दिनकर पाटील, साक्षी प्रेम शामनानी, आदिती संतोष अलाहित (गुरुकुल इंग्लिश मीडियम)
तृतीय क्रमांक
मानसी पाटील व वैष्णवी शरद वाघ, एम एम महाविद्यालय (चंद्रयान)
तर प्राथमिक गटात
प्रथम क्रमांक
प्रेम अतुल सोनवणे, नवजीवन विद्यालय (न्यूटन्स कॅन्डल)
द्वितीय क्रमांक
अर्पिता प्रेम शामनानी, किंजल जितेंद्र वाधवाणी (Lungs Model) गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल
तृतीय क्रमांक
रुपेश गुंजन सोनार, प्रथमेश रवींद्र नेवे, भावेश जगन्नाथ पाटील, तन्मय भिकन मराठे, अथर्व ज्ञानेश्वर गायकवाड
गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल (Valcano)
आता वेळ होती ती म्हणजे बालक चिमुकल्यांच्या कार्यक्रमाची या कार्यक्रमांमध्ये प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनियर केजी, पाचवी ते नववी वर्गाच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला व अफलातून असा परफॉर्मन्स सादर केला. सर्व चिमुकल्या बालकलाकारांचे उपस्थित मान्यवर व पालकांनी कौतुक केले. अतिशय सुंदर असा अभिनय सर्वांनी सादर केला. सोलो डान्स, ग्रुप डान्स, मिक्स डान्स, डान्स विथ पेरेंट्स, फॅन्सी ड्रेस इत्यादी प्रकाराचे कलाकृती विद्यार्थ्यांनी सादर केल्या. या कार्यक्रमासाठी झेरवाल अकॅडमी व प्री स्कूल सेंटरचे असंख्य विद्यार्थी व पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी टी. डब्ल्यू. सी. तुषार वानखेडे क्रिएशन चे तुषार वानखेडे, प्रेम मोरे, प्रथमेश ठाकूर, मानसी पाटील, चैतन्या पाटील, स्वरा भावसार, स्वयम भावसार, लीना इ यांनी मेहनत घेतली तसेच झेरवाल अकॅडमीच्या अकरावी चे विद्यार्थी हिमांशू, शंतनू, हितेश , पंकज, अर्जुन, निखिल, साक्षी, प्रियदर्शनी, हंसिका, मंथन, रितिकेश, कृष्णा या सोबत असंख्य विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी झेरवाल प्री स्कूल सेंटरची शिक्षिका वैशाली देवरे मॅडम, वैशाली पाटील मॅडम, अश्विनी पाटील मॅडम, जयश्री मोरे मॅडम, तसनीम बोहरा मॅडम इ तथा झेरवाल अकॅडमी तर्फे प्रा अमोल झेरवाल सर, प्रा गायत्री झेरवाल मॅडम, प्रा बी एन पाटील सर, प्रा श्रीकृष्ण महाजन सर यांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवोल जोशी सर तसेच तसलीम मॅडम यांनी केले तर सर्व बालकलाकारांचे कौतुक, उपस्थित मान्यवरांचे, पालक वर्गांचे आभार प्रा. अमोल झेरवाल सर यांनी व्यक्त केले.