जळगाव :- राज्यात दिवेसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत असतात. त्यातच जळगावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीचा पाठलाग करत तिला जंगलात नेऊन तिचा विनयभंग केला असल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. फेसबुकवर ओळख झालेल्या एका अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीला जंगलात बोलावून तिच्यासोबत तिला लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं. त्यानंतर मुलाने वेळोवेळी मुलीचा पाठलाग करत तिला त्रास दिला. “माझ्याशी लग्न कर नाहीतर, तुझ्या वडिलांना मारुन टाकेन”, अशी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी मंगळवारी अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन मुलीला त्रास देणाऱ्या अल्पवयीन मुलाविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी कुटुंबासह वास्तव्यास आहेत. या अल्पवयीन मुलीची जानेवारी महिन्यात फेसबुकच्या माध्यमातून जळगाव शहरातील एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलासोबत ओळख झाली. यातून दोघंही एकमेकांशी चॅटींगवर बोलू लागले. त्यानंतर महिनाभरानंतर आरोपी मुलगा १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेटाईन डेच्या दिवशी मुलीचा विश्वास संपादन करत तिला जळगाव शहरात लगत असलेल्या एका तलाव परिसरातील जंगलात फिरायला घेऊन गेला.
त्याठिकाणी मुलाने मुलीसोबत तिला लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य करत तिचा विनयभंग केला. यानंतर तरुणाने १४ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान मुलगी जिकडं जायची, तिकडे मुलगा तिचा पाठलाग करुन तिला त्रास देतो. एवढंच नाही तर मुलगा मुलीशी अधूनमधून रात्री बेरात्री अश्लिल चॅटींगसुध्दा करतो. “माझ्याशी लग्न कर”, असं मुलीला म्हणत असतो आणि “लग्न नाही केलं तर तुझ्या वडिलांना मारुन टाकेन”, अशी धमकी यादरम्यानच्या काळात मुलाने मुलीला दिल्याचं तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, या त्रासाला कंटाळून ६ मार्च रोजी मुलीने तिच्या वडिलांना एक मुलगा सतत पाठलाग करत असतो, असं सांगितलं. यानंतर वडिलांनी आपल्या मुलीला विश्वासात घेतलं. त्यानंतर मुलीने तिच्यासोबत गेल्या दीड महिन्यात घडलेला सर्व प्रकार सांगितला. ही माहिती ऐकून मुलीच्या वडिलांना धक्काच बसला. त्यानंतर वडिलांनी दुसऱ्या दिवशी शनिपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
या तक्रारीवरुन मुलीला त्रास देत तिचा विनयभंग करणाऱ्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलाविरोधात विनयभंग तसेच बाल लैंगिक अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरिक्षक प्रिया दातीर या करत आहेत.
हे वाचलंत का ?
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४