आई, प्लीज वाचव! ते मला संपवतील! फोनवर ओक्साबोक्शी रडला; बॉडी १३०० किमी दूर दोन भागात सापडली

Spread the love

Crime News :- सध्या देशात घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच आसाममध्ये राहणाऱ्या तरुणाचा मृतदेह उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये आढळला. रेल्वे रुळांवर दोन भागांत हा मृतदेह सापडला. मृत्यूपूर्वी त्यानं आईला फोन केला होता. आई, कृपया मला वाचव, अशी आर्त साद घालत तरुण ओक्साबोक्शी रडला होता.

तुतन डे असं मृत तरुणाचं नाव आहे. गोरखपूरमधील रेल्वे रुळांवर त्याचा मृतदेह दोन भागांत आढळून आला. त्याच्या मृत्यूचं गूढ अद्याप उलगडलेलं नाही. ‘आई, प्लीज मला वाचव. ते मला मारून टाकतील. मग मी तुला कधीच पाहू शकणार नाही. प्लीज मला वाचव आई,’ असं तुतननं शेवटच्या कॉलवर आईला सांगितलं होतं.

ट्रेनच्या एसी डब्यांमध्ये बेडरोल पुरवण्याचं काम तुतन करायचा. १ मार्चला त्यानं लुमडिंगहून दिब्रूगढला जाण्यासाठी प्रवास सुरू केला. दिब्रूगढहून तो दिब्रूगढ-गोरखपूर स्पेशल होळी ट्रेन पकडली. या ट्रेनमध्येही तो बेडरोल पुरवण्याचं काम करत होता. ट्रेनमध्येच तुतनची हत्या करण्यात आली असावी आणि त्याचा मृतदेह गोरखपूर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर टाकण्यात आला असावा, अशी शंका त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.

हत्येपूर्वी तुतननं आईला कॉल केला होता. ‘संशयितांनी मला मारण्याचा कट रचला आहे. शनिवारी रात्री माझी हत्या होईल,’ असं तुतननं आईला सांगितलं होतं. तुतन घाबरला असावा असं सुरुवातीला त्याच्या कुटुंबाला वाटलं. मात्र त्यानंतर दुर्दैवानं त्याच्या निधनाची बातमी आली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आरोपींची ओळख अद्याप पटलेली नाही.

माझे पती तुतन डे १ मार्चच्या संध्याकाळी लुमडिंगला जायला निघाले. तिथून ते दिब्रूगढ रेल्वे स्थानकात गेले. ते एसी ट्रेनमध्ये बेडरोल पुरवण्याचं काम करायचे. गोरखपूरला जाणाऱ्या स्पेशल ट्रेनमध्ये ड्युटी करायची असल्याचं बेडरोल मॅनेजरनं त्यांना सांगितलं. त्यानंतर २ मार्चला ते गोरखपूरला जाण्यास निघाले. त्या रात्री त्यांनी मला कॉल केला. काय जेवलीस वगैरे विचारणा केली,’ असा घटनाक्रम तुतन यांच्या पत्नीनं सांगितला.

दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा कॉल केला. त्यावेळी ते अतिशय अस्वस्थ वाटत होते. संपूर्ण रात्र झोपलो नसल्याचं त्यांनी सांगितलं. मी वाचू शकणार नाही, असं ते म्हणाले. त्यांनी आईला फोन देण्यास सांगितलं. आईनं फोन घेतला. इतका अस्वस्थ का वाटतंय, अशी विचारणा केली. त्यावर ट्रेनमघील काही जण माझ्या हत्येची योजना आखत आहेत. त्यांच्या हालचालींवरून ते मला संपवण्याचा कट करत असल्याचं दिसतंय, असं तुतन म्हणाले होते,’ अशी माहिती त्यांच्या पत्नीनं दिली. ‘आई, ते मला मारून टाकतील. प्लीज मला वाचव, असं ते रडत रडत कॉलवर सांगत होते. त्यांनी शेवटचा कॉल गोरखपूरहून केला होता,’ असं तुतनच्या पत्नीनं सांगितलं.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार