अखेर त्या शेळ्या चोरट्यांना जेरबंद करण्यास सावदा पोलिसना यश.

Spread the love

रावेर तालुका प्रतिनिधी

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील आठवड्या बाजाराच्या परिसरात खंडेराव मंदिरासमोरील रस्त्याच्या कडेला बाजाराच्या ओट्यास कार लावून ३ चोरट्यांनी पूर्वनियोजितपणे शेळ्यांना त्यांचे आवडते खाद्य पदार्थ मक्या व जवारी टाकून त्यांना वाहन पर्यंत आणून दिवसाढवळ्या ३ ते ४ शेळ्यांना चोरीच्या उद्देशाने थेट कोंबून नेत असताना येथील स्थानिक सै.हसन सै.अलाउददीन उर्फ लाला या धाडसी तरुणांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव उधळल्याने चोरट्यांची कार व एका चोरटेचा ओप्पो या कंपनीचा मोबाईल फोन देखील पोलिसांच्या हाती लागल्याची घटना दि.२४ जानेवारी २०२२ च्या दिवशी समोर आली होती.

सदरील धाडसी तरुणामुळे शेळ्या सह चोरट्यांनी त्याची कार क्र.एम एच ०२ ऐवाय ५१२९ घटनास्थळी सोडून पळ काढला.या दरम्यान एका चोरटेचा ओप्पो या कंपनीचा मोबाईल फोन कारमध्ये पडून गेल्याने ते सावदा पोलिसांच्या हाती लागल्याने त्या शेळ्या चोरट्यांना शोधून काढणे सावदा पोलिसांना सोईचे झाल्याने त्यांनी तपास चक्रे फिरवून नासिक येथून अशपाक गुलाब खाटीक,व तौबीर मो.आमिन या दोन्ही संशयीत चोरट्यांना जेरबंद करून दि.३ जानेवरी २०२२ रोजी सावदा पोलीस स्टेशनमध्ये आणले असता शेख अजीज शेख शरीफ रा.शेखपुरा सावदा ता.रावेर यांनी फिर्याद दिल्याने त्यांच्या विरुद्ध गुरनं.१३/२०२२ भांदवीचे कलम ३७९ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून त्या दोन्ही संशयित आरोपींना आज रावेर न्यायालय येथे हजर करण्यात येणार होते. सदरील गुन्ह्याचा तपास एपीआय देविदास इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहे.

टीम झुंजार