अध्यक्षपदी,संजय पवार,उपाध्यक्षपदी अमोल पाटील यांची निवड.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (जेडीसीसी) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आज मोठा ट्विस्ट पहायला मिळाला.जिल्हा बॅकेत अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे रविंद्र भैय्या पाटील यांचे नाव निश्चित झाले असतानाही राष्ट्रवादीचे संजय पवार यांनीही आयत्यावेळी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला.यानंतर गुप्त पद्धतीनं मतदान झालं. यामध्ये संजय पवार विजयी झाले आहेत.
पक्षाचे श्रेष्ठी व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेअंती जिल्हा बँकेत पुढील एक वर्षांसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला होतं. त्यानुसार रविंद्र भैय्या पाटील यांनी अर्ज दाखल केला. मात्र, यानंतर नाट्यमय घडामोडी घडत अध्यक्षपदासाठी बंडखोरीची चर्चा सुरु झाली. रवींद्र पाटील यांचे नाव निश्चित झाल्यांनंतरही अजून दोन अर्ज दाखल झाले होते.

आयत्या वेळी अर्ज भरण्याची मुदत संपण्याआधी संजय पवार यांनीही अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. मतदान होवून संजय पवार विजयी झाले. त्यांना सुचक म्हणून शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील तर अनुमोदक म्हणून जिल्हा बँकेचे तत्कालीन उपाध्यक्ष शामकांत सोनवणे यांनी अनुमोदन दिलं होतं.तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अमोल चिमणराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.संजय पवार यांना ११ तर रविंद्रभैय्या पाटील यांना १० मते पडली. या निवडणुकीची सूत्र आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे होती.

त्यांनी मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय खेळी करून संजय पवार यांना विजयी करण्यात मोठी भूमिका बजावली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेली जळगाव जिल्हा बँक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या ताब्यात गेली आहे.
संजय पवार राष्ट्रवादीतून फुटून शिवसेनेत गटात सामील झाल्याने जिल्हा बँक राष्ट्रवादीच्या हातातून निसटली आहे.भाजप व शिवसेना मिळून दोघी पक्षाच्या नेत्यांनी एकनाथराव खडसे यांचे सहकार क्षेत्रातील वर्चस्व कमी केले आहे.
हे देखील वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






