व्यवस्था साहित्यिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे-

Spread the love

  • बौद्ध साहित्य संमेलन नियोजन सभेप्रसंगी मुकुंद भाऊ सपकाळे यांचे प्रतिपादन

  • स्वागताध्यक्ष प्रा. भरत शिरसाठ यांनी मांडली संपूर्ण संमेलनाची भूमिका!
    ……………………………………….

जळगाव :- सध्या देशामध्ये साहित्यिक आणि विचारवंतांचा आवाज दाबला जात आहे. पुरोगामी विचारवंतांची मुस्कटदाबी होत आहे. भारतीय संविधानाने विचार स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले असताना आपल्याला नकोसे असलेले साहित्य प्रकाशित होणार नाही, यासाठी दबाव तंत्राचा वापर होत आहे. बौद्ध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून समतेचा आणि मानव मुक्तीचा आवाज बुलंद केला जाणार असल्याचे प्रतिपाद राज्यस्तरीय तिसरे बौद्ध साहित्य संमेलन राज्य समन्वय समितीचे सामाजिक विभागाचे अध्यक्ष माननीय मुकुंद भाऊ सपकाळे यांनी संत चोखामेळा बोर्डिंग बुद्ध विहार जळगाव या ठिकाणी आयोजित सभेत केले.


साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. भरत शिरसाठ यांनी संपूर्ण साहित्य संमेलनाची भूमिका विषद केली. साहित्य संमेलनामध्ये होणारे परिसंवाद, चर्चासत्र, कवी संमेलने व सांस्कृतिक कार्यक्रमाचा आढावा घेतला. राज्यभरातून 200 साहित्यिकांची उपस्थिती लाभणार असून 2 एप्रिल रोजी संविधान सन्मान रॅली व 3 एप्रिल रोजी धम्म जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर रॅली करता जिल्ह्यातील समता सैनिक दल व महार रेजिमेंटच्या सैनिकांमार्फत रॅलीचे संयोजन केले जाणार आहे व मानवंदना दिली जाणार आहे. संपूर्ण रॅलीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता आपण घेणे गरजेचे आहे आणि संमेलन यशस्वीपणे पार पाडावे, असे आवाहन प्रा. भरत शिरसाठ यांनी केले.
या संदर्भात आपली भूमिका मांडताना ज्येष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ यांनी बौद्ध साहित्याच्या इतिहासावर प्रकाश टाकला.

बुद्ध विचार हा सर्व क्रांतींची जननी आहे. साहित्य चळवळींची जननी आहे. म्हणून हा बुद्ध विचार शुद्ध स्वरूपात समाजामध्ये पसरविणे, हे आपले कर्तव्य आहे. या साहित्य संमेलनाला यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील बौद्ध साहित्यकांनी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत, असे आपल्या मनोगतात त्यांनी व्यक्त केले.
संपूर्ण सभेचे सूत्रसंचालन कार्यवाह समितीचे प्रमुख डॉक्टर अशोक सैंदाणे यांनी केले. शिक्षक समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष धनराज मोतीराय, राज्य समन्वय समितीचे गोंदियाचे सदस्य नितेश डोंगरे व जळगाव शहर समन्वयक समितीचे प्रमुख बाबुराव वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा संयोजन समितीच्या अध्यक्षपदी सर्वांनुमते ज्येष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ यांची निवड करण्यात आली.

विविध समित्यांचे गठन याप्रसंगी करण्यात आले. संविधान सन्मान रॅली च्या प्रमुख पदी सतिश गायकवाड , समाधान सोनवणे यांची निवड करण्यात आली. धम्म जागृती रॅली प्रमुख पदी पाळधी येथील चैतन्य ननवरे व विनोद रंधे यांची प्रमुख पदी निवड करण्यात आली. संतोष गायकवाड यांची धम्म जागृती रॅली च्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. स्टेज समिती मध्ये उदय सपकाळे, युवराज वाघ, संतोष गायकवाड यांची निवड करण्यात आली. प्रमुख मान्यवर व्यवस्था समितीमधे अध्यक्षपदी सुरेश सपकाळे यांची तसेच चैतन्य नन्नवरे, संतोष गायकवाड, वाल्मिक सकपाळ, भालचंद्र बावस्कर व युवराज वाघ यांची निवड करण्यात आली. संयोजन समितीमध्ये सचिवपदी अमळनेर येथील एडवोकेट रणजीत बिऱ्हाडे यांची निवड करण्यात आली. जळगा

साहित्यिक समन्वय समितीमध्ये उपाध्यक्षपदी डॉक्टर सत्यजित साळवे यांची निवड करण्यात आली. महिला समन्वय समितीच्या अध्यक्षपदी पाचोर्‍यातील संगीता साळुंखे, उपाध्यक्षपदी संजीवनी रत्नपारखे व सचिव पदी सामाजिक कार्यकर्त्या निवेदिता ताठे व सहसचिव पदी छाया सोनवणे यांची निवड करण्यात आली. जळगाव,भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, एरंडोल, चाळीसगाव, धरणगाव, पाचोरा, रावेर, जामनेर, इत्यादी तालुका समन्वय समितीतील पदाधिकारी सदर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते. जळगाव जिल्हा बौद्ध शिक्षक संघाचे तालुका संपर्क प्रमुख राहुल सोनवणे, अजय भामरे, सोपान भवरे, जे.पी. सपकाळे, संजय निकम, प्रशांत नरवाडे, योगेश्र्वरी इंगळे, सुषमा जवादे, प्रकाश तामस्वरे, सुधाकर मोरे, कैलास पवार, सुरेश सुरवाडे, रावसाहेब जगताप, ए. बी. मोरे, प्रा. प्रितीलाल पवार, सुनील डांगरे, समाधान जाधव, महेंद्र मेढे, प्रमोद खैरे, इत्यादी संपर्कप्रमुख मोठ्या प्रमाणावर जिल्हाभरातून उपस्थित होते.

महार रेजिमेंटचे भरत तायडे व त्यांचा संघ आपल्या गणवेशात उपस्थित होते. साहित्यिक रा. शे. साळुंखे, विवेक सैंदाणे, सुधाकर बडगुजर, प्रमोद उंबर, विजय लुल्हे, हरिश्चंद्र सोनवणे, प्राध्यापक संजय साळवे, जय वाघ, भालचंद्र सोनवणे, मिलिंद सोनवणे, संतोष सोनवणे, सुरेश सोनवणे, सुरेखा सपकाळे, दिलीप सपकाळे, विश्र्वनाथ भिवसने, संतोष कदम, किसन सुर्यवंशी, संदिप पाटील तसेच जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर बौद्ध उपासक- उपासिका व बहुजन चळवळीतील कार्यकर्ते तसेच विविध समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. सम्राटचे संपादक कालकथीत बबनजी कांबळे यांना आदरांजली अर्पण करून सभेची सांगता झाली.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार