महाराष्ट्रात मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता, हवामान खात्याचा इशारा

Spread the love

:मागील काही दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कडाक्याची थंडी जाणवत आहे. यानंतर आता राज्यात अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. येत्या दोन दिवसानंतर

मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. ऐन हिवाळ्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीची

शक्यता निर्माण झाल्याने राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेल्यानंतर रब्बी हंगामात निर्माण झालेल्याया अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक कंबरडं मोडण्याची शक्यता आहे.

खरंतर, सध्या वायव्य आणि मध्य भारतात पश्चिमी चक्रावात आणि त्याच्या चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव जाणवत आहेत. त्यामुळे हरियाणासह उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश या भागात मुसळधार पावसासह गारपिटचा इशारा देण्यात आला आहे.

याचा एकंदरित परिणाम म्हणून राज्यातही अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान तयार होतं आहे. मंगळवारपासून राज्यात कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

टीम झुंजार