शेतकऱ्यांची आर्त हाक;वन्य प्राण्यां पासून शेतीचे पिक वाचवा:- तहसीलदारां ना निवेदन.

Spread the love

किसान सभा व भाकप आंदोलन करणार



प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल.. तालुक्यातील विखरण येथील बागायतदार शेतकऱ्यांची शेतातील मका, दादर ,कांदा ,सुर्य फूल आदी विखरण शिवारातील शेतकऱ्यांची पिकांवर रोही रानडुकरं हरणे इत्यादी वन्य पशू शेतात घुसून विध्वंस करीत आहेत नासाडी करीत आहेत या वन्य प्राण्यांच्या पासून शेतकऱ्यांनी पीके वाचविण्यासाठी वनखात्याने उपाययोजना न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा एरंडोल तहसीलदार व वन परिक्षेत्राधिकारी एरंडोल वन विभाग यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्फत शेतकऱ्यांनी दिला आहे.

याबाबत सविस्तर असे की .विखरण तालुका एरंडोल येथील वर नमूद 15/20 शेतकऱ्यांची शेत चोरटक्की जंगल वनक्षेत्राच्या नजीक आहेत त्यांनी सालाबाद प्रमाणे यावर्षी आपल्या शेतामध्ये मक्का ,दादर, सूर्य फूल कांदा आदी ही पिके पेरली आहेत . या शेतकऱ्यांनी पेरलेल्या उभ्या पिकात रात्री-बेरात्री दिवसाढवळ्या चोरटकी चे जंगलातील रोही, रान डुकरे हरणे सर्रास घुसून पिकांची नासाडी करतात हे प्रकार नित्याचे झाले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नातून ५०% ते ७०% टक्के उत्पन्नास मुकावे लागत आहे अशा तऱ्हेने त्यांच्या मुलाबाळांच्या तोंडचा घास हिरावून घेतला जात आहे. वनविभागाने व शासनाने प रोही रान डुकर यांचा बंदोबस्त करावा शेतकऱ्यांची पिके वाचवावीत अशी आर्त हाक विखरण गावातील 14 शेतकरी यांनी शासणाधिकरी यांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते काम्रेड अमृत महाजन व भाकप तालुका सचिव संजय बागड यांचे मार्गदर्शनात सादर केली आहेत

निवेदनावर, अनिल सुखदेव महाजन महेंद्र शांताराम महाजन रतिलाल तुकाराम महाजन सुभाष जंगलु महाजन गंभीर जंगलु महाजन, गुलाब सुपडू महाजन, रघु उखरडू पाटील पंडित सूपडू महाजन,छोटू चंदन मिस्तरी रावा आधार चौधरी, पुरुषोत्तम हरी महाजन, सोपान रामदास मिस्‍तरी, उमराव तापिराम महाजन आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.या निवेदनात मागण्या केल्या आहेत त्या अशा.. या वन्य प्राण्यांच्या पासून पिकांची नासाडी थांबवणेसाठी वनविभागाने शेतकऱ्यांची शेती व वनविभाग हद्द दरम्यान जाळीदार कुंपण तयार करावे पीक नुकसानीचा पंचनामा करून नुकसाभरपाई द्यावी वन्यप्राण्यांसाठी चारा उपलब्ध करावा याबाबत उपाय योजना कराव्यात अशा उपाय योजना न केल्यास एरंडोल तहसीलदार कार्यालयावर शेतकऱ्यांचे आंदोलन छेडले जाईल असाही इशारा शासनास सादर केलेल्या निवेदनात देणेत आला आहे .

https://www.facebook.com/झुंजार-लाईव्ह-न्युज-113192607933883/

याबाबत अधिक माहिती अशी की, अशाच तऱ्हेचे नुकसानीचे प्रकार चोरटक्की खडके आदी वनक्षेत्र हद्दीलगतच्या गावामधे घडत असतात तसे पत्रक भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड लक्ष्मण शिंदे व जेष्ठ नेते अमृतराव महाजन तालुका सचिव संजय बागड यांनी प्रसिद्ध केले आहे.

टीम झुंजार