जळगाव :- सध्या जळगाव जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार व स्थानबद्ध करण्याचे जोरात सुरू आहे.जळगाव जिल्ह्यात टोळीने गुन्हे करणाऱ्या जळगाव शहरातील गेंदलाल मील येथील तीन गुन्हेगारांना जळगाव जिल्ह्यातून २ वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी याबाबतचे आदेश शुक्रवार 17 मार्च रोजी पारित केले आहेत.
किरण अनिल बाविस्कर (वय 24), आकाश सुरेश बर्वे (वय 23) व महेश उर्फ मन्या संतोष लिंगायत (वय 21) तिघे रा. गेंदालाल मिल अशी हद्दपार करण्यात आलेल्या तिघा गुन्हेगारांची नावे आहेत.
जळगाव शहरातील गेंदालाल मिल येथील किरण बाविस्कर , आकाश बर्वे व महेश लिंगायत हे सराईत गुन्हेगार असून या तिघांनी टोळीने राहून विविध प्रकारचे गुन्हे केले आहेत. या तिघां विरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात तब्बल नऊ वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत
तेही टोळीने राहून नागरिकांमध्ये दहशत पसरवितात वेळोवेळी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून सुद्धा त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही त्यामुळे जळगाव पोलीस स्टेशनच्या वतीने तिघांच्या हद्दपारचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक यम राजकुमार यांच्याकडे पाठवण्यात आला होता. या प्रस्तावानुसार पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी शुक्रवारी आदेश पारित करत किरण बाविस्कर आकाश बर्वे व महेश उर्फ मन्या लिंगायत यातिघा गुन्हेगारांना दोन वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
हे देखील वाचा
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४