प्रतिनिधी l पारोळा
नगरपरिषदेकडून नव्याने केलेल्या अवास्तव भाडे व घरपट्टी आकारणीला पालिकेचे नवीन नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून येवून अपील सुनावणी घेईपर्यंत शासनाकडून स्थगिती मिळाली आहे.याकामी माजी उपनगराध्यक्ष डाँ.मंगेश तांबे यांनी पुढाकार घेवून आ.चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नातून स्थगिती मिळवून आणली आहे.तसे पत्रही आ.पाटील यांनी डाँ.तांबे यांना दिले.
पालिकेच्या अवास्तव कर आकारणीला दोन दिवसांपूर्वीच संचालक नगरपरिषद संचालनालय यांचेकडून तात्पुरती स्थगिती देऊनही जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी अपील समिती गठीत केल्याचे आदेश दिल्याने या विषयावर आ.चिमणराव पाटील, जिल्हा बँकचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्याकडे डाँ.तांबे यांनी न.पा.ची नवीन बाॅडी येईपर्यंत स्थगिती मिळावी अशी आग्रही विनंती केली.

त्याचवेळी मुंबई येथे अधिवेशनात असलेले आ.पाटील यांनी शहरातील नागरिकांच्या हितासाठी तांबे यांना मुंबईत बोलावून घेतले. या प्रक्रियेस नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून येतील तोपर्यंत स्थगीती मिळणेबाबत कार्यवाही स्वतः सुरु केली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंंती करुन सुधारित स्थगिती आदेश नगरविकास विभाग येथून मिळवून दिले.

त्यामुळे शहरातील जनतेला न्याय मिळाला आहे.या अन्यायकारक प्रक्रियेत सर्वसामान्य, मध्यमवर्गीय आणि सर्व जनतेची होणारी मोठी आर्थिक लुट संवेदनशील आ. पाटील यांच्यामुळे थांबली आहे.अशी भावना व्यक्त करीत माझ्या विनंतीप्रमाणे सर्व मागण्या शासनाकडून मंजूर करुन दिल्याबद्दल आ.चिमणराव पाटील,जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांचे आभार डाँ.मंगेश तांबे यांनी मानले आहेत.
हे देखील वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम