बिबट्या दररोज रात्री शेतात येऊन करतो काय? शेतकऱ्याने CCTV पाहिला अन् धक्काच बसला

Spread the love

मुंबई : सोशल मीडियावर एक अशी बातमी समोर आली आहे, ज्याबद्दल ऐकून तुम्हाला त्यावर विश्वास बसणार नाही पण ही गोष्ट खरी असल्याचा दावा एका शेतकऱ्याने आणि त्याच्या बायकोनं केला आहे.तसेच याचा पुरावा म्हणून त्यांनी सीसीटीव्ही फुटेज देखील अधिकाऱ्यांना दिले. खरंतर बिबट्या हा सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे, तो शिकार करुन आपलं पोट भरतो. यासाठी तो इतर प्राण्यांवर हल्ला करतो, तसेच तो एखाद्या गावात घुसला तर तेथील पाळीव प्राणी जसे कुत्रा, गाय, बैल यांच्यावर हल्ला करतो.

पण एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे, ज्यामध्ये बिबट्या काहीतरी वेगळंच करताना पकडला गेला आहे.एका शेतकऱ्याच्या शेतात रात्रीच्या वेळी दररोज एक बिबट्या यायचा. या शेतात अनेक प्राणी होते, पण असं असलं तरी देखील शेतातील प्राण्यांना काहीच झालं नाही, त्यानंतर शेतकऱ्याला प्रश्न पडला की शेतात हा बिबट्या येऊन नक्की करतो तरी काय? जर त्याला कोणाची शिकार करायचीच नसते, मग तो माझ्या शेतात येऊन करतो काय? बिबट्याचं असं वागणं पाहून शेतकऱ्याच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली.

तेव्हा त्याने सीसीटीव्ही फुट लावले आणि घराबाहेरील सगळ्या परिसरात लक्ष ठेवले, त्यावेळी शेतकऱ्याला जे दिसलं त्यावर त्याला स्वत:ला ही विश्वास बसत नव्हता. त्याने हा सगळा प्रकार पोलिसांना सांगितला, पण त्यांना शेतकऱ्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही आणि ते शेतकऱ्यावर हसू लागले. आता असं ऐकल्यावर तुमच्या मनात देखील उत्सुक्ता लागली असेल की नक्की त्या शेतात असं काय होतं की बिबट्या तेथे रोज यायचा आणि कोणाला काहीच करायचा नाही? तर त्या शेतात होती गाय…

(सीसीटीव्हीमधील दृश्य)

या सीसीटीव्ही कॅमेरात शेतकऱ्याने पाहिलं की शेतात येऊन बिबट्या त्याच्या गायीजवळ जाऊन बसायचा. हो तो फक्त गायीशी संवाद साधण्यासाठी आणि तिच्या प्रेमापोटी तेथे यायचा. शेतकऱ्याने सांगितले की, “हा बिबट्या गायीजवळ पोहोचला तेव्हा गायीच्या चेहऱ्यावर किंवा वागणूकीत भीतीचे कोणतीही चिन्हे दिसत नव्हते. प्रत्यक्षात ती बिबट्याची वाट पाहत होती. गाय बिबट्याला चाटायला लागली जणू ती त्याचे स्वागत करत होती आणि बिबट्या देखील फार आनंदी होता. बिबट्या नंतर गुरगुर करु लागला जणू काही त्याला दिलासा मिळाला होता.”

(सीसीटीव्हीमधील दृश्य)

पुढे शेतकरी म्हणाला, ”बिबट्या गाईवर नाक घासत राहिला आणि गाय बिबट्याला मायेनं पाहात राहिली. निसर्गाला आव्हान देणारा हा क्षण होता आणि शेतकऱ्याला तो जादुई वाटला.” जरी बिबट्या शेतकरी आणि इतर प्राण्यांना काहीही नुकसान करत नव्हता. तरी शेतकऱ्याच्या बायकोला हे वागणं विचित्र वाटलं, त्यांनी अधिकाऱ्यांना याबद्दल सांगितलं आणि त्यांना विनंती केली की या बिबट्याचं काहीतरी करा. अधिकाऱ्यांना या गोष्टीला आधी मस्करीत घेतलं, पण शेतकऱ्याने त्यांना जेव्हा व्हिडीओ पाठवला तेव्हा त्यांना ही आश्चर्याचा धक्का बसला.

हे देखील वाचा

टीम झुंजार