निंभोरा येथे मरणानंतरही यातना सुरूच प्रेताची फरपट.स्मशानभूमीची दूरदर्शा

Spread the love

निंभोरा प्रतिनिधी
परमानंद शेलोडे

निंभोरा येथील स्टेशन परिसरातील समशान भूमी ही नवीन रेल्वे उड्डाणपूल विस्तारीकरणामुळे तोडण्यात आली होती. त्यावेळी संबंधित ठेकेदार व लोकप्रतिनिधी यांनी ती लवकरच पुन्हा नव्याने योग्य त्या ठिकाणी बांधण्यात येईल असे सांगितले मात्र विगत २/३ वर्षापासून उड्डाणपुलाचे काम हे अंतिम टप्प्यात आले असूनही या कामात दिरंगाई होत असून सुमारे २००० हजार लोकसंख्या असलेल्या या स्टेशन परिसरातील लोकांना याची फार मोठी यातना मरणानंतरही सुरू असून त्यामुळे अंतसमयी अंतिमसंस्कार करतांना मोठ्या प्रमाणात अडचणी येतात गेल्या २ वर्षापासूनच्या पावसाळा सुरू असतांना तसेच आताही अवकाळी पावसामुळे विशेषतः हा प्रश्न जास्त डोके वर काढतो अन पावसाळ्याचे दिवस मागे सरले की पुन्हा वर्षभर हा विषय मागे पडतो यामुळे या भागातील ग्रामस्थांनची मोठ्या प्रमाणावर नाराजी असून नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.


प्रत्यक्षात हा प्रश्न सुटण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती सोबतच प्रशासकीय यंत्रणा लोकप्रतिनिधी यांच्या सुस्त राजकारण आहे असे या परिसरातील रहिवाशांचे ओरड होत आहे.

सचिन महाले सरपंच निंभोरा बु:
या संदर्भात मी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांच्याशी बोललो असून त्यांनी लवकरच हे काम पूर्ण होईल याची खात्री दिली.


सागर चौधरी परिसरातील रहिवासी
मृत्यूनंतरही प्रेताची व नातेवाईकांची ही खेदजनक बाब असून संबंधित ठेकेदार व लोकप्रतिनिधी ही टोलवा टोलवी मुळे हा प्रश्न सुटत नसेल तर आम्ही शेवटी आंदोलन करू.

छायाचित्रात

तात्पुरत्या स्वरूपात केलेल्या समशानभूमी जवळ जमलेले पाण्याचे डबके व प्रेतावर अंतिमसंस्कार करण्यासाठी आलेले नातेवाईक.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार