जळगाव : सध्या महाराष्ट्रात घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव जिल्हयात गेल्या तीन ते चार दिवसांपासून खुनाचे सत्र सुरूच असून रविवारी रात्री १० वाजता जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमध्ये ३० ते ३५ वर्षीय तरूणाची धारधार शस्त्राने भोसकून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली.
प्राप्त माहिती नुसार शहरातील गोलाणी मार्केटच्या तळमजल्यावर सोपान गोविंदा हटकर (३०, रा. हरिविठठल नगर) या तरुणाचा धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री १० वाजता घडली. मात्र, खून होण्यापूर्वी गोलाणी मार्केटच्या तळमजल्यावर काही तरुणांमध्ये वाद झाला होता, त्यातून हा खून झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आल्यानंतर आजू बाजूच्या लोकांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली.
गोलाणी मार्केटमध्ये तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एलसीबीचे निरीक्षक किसन नजनपाटील, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी पोहचले आहेत. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविला. तर नेमकी काय घटना घडली याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






