जळगाव : काही दिवसांपूर्वी भजे गल्लीमध्ये दारू पिवून वाद घालणा-या तरूणांना जिल्हापेठ पोलिसांनीपोलिस ठाण्यात नेले होते. याचा राग मनात ठेवून त्या तरूणांनी मित्रांसोबत जेवण्यासाठी हॉटेलात आलेल्या गणेश मधूकर पाटील (३८) या पोलिसाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून चॉपरने वार केल्याची घटना हॉटेल रिगल पॅलेसमध्ये मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी बुधवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून एक संशयित अद्याप फरार आहे.
पोलिस गणेश पाटील हे जिल्हापेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असून ते मंगळवारी रात्री त्यांचे मित्र मयूर गवळी व सिताराम पुरोहीत यांच्यासोबत जेवणासाठी हॉटेल रिगल येथे गेले होते. समोरील टेबलावर बसलेले दोन जण त्यांच्याजवळ आले. त्यांनी दादा तुम्ही आम्हाला ओळखल का? असे विचारले. गणेश पाटील यांनी त्यांना मी तुम्हाला ओळखत नाही असे सांगितले. त्यानंतर त्यातील एकाने आम्ही भजे गल्लीतील हॉटेलमध्ये दारु पिवून वाद घातला होता. तुम्ही पोलीस गाडी घेवून आले होते. आणि आम्हाला पोलीस ठाण्यात घेवून गेले होते, असे त्यांनी सांगितल्यावर पाटील यांनी त्यांना ओळखले. काही वेळानंतर त्या तरुणांनी पाटील यांच्या शेजारच्या टेबलावर बसलेल्या समाधान बारी व परवेज शेख यांना पाण्याची बाटली मारुन फेकली. बारी यांनी त्यांना जाब विचारला असता त्या चौघांनी त्यांना शिवीगाळ करीत दमदाटी केली.
खिशातून फायटर काढून केला वार
दरम्यान, चौघे तरुण वाद घालत असल्याने गणेश पाटील हे त्यांना समजावित असतांना त्यांनी तु कोण रे तुझा काय संबंध आहे येथे, तु यापुर्वी मला पोलीस स्टेशनला घेवून गेला होता. तेव्हा पासून तु माझ्या डोक्यात बसला आहे. आता तु चांगलाच सापडला आहे, आता माझे मित्र सुद्धा आहेत, तु काही करु शकणार नाही, असे म्हणत वाद घालणार्या तरुणांपैकी एकाने खिशातून फायटर काढून गणेश पाटील यांच्या चेहर्यावर मारुन त्यांना गंभीर दुखापत केली. तसेच त्याच्यासोबत असलेल्या तिघांनी त्यांना खाली पाडून त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले.
चौघांविरूध्द गुन्हा
सोबत असलेल्या लोकांनी गणेश पाटील यांची मारहाण करणार्यांच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर त्यांनी घटनेची माहिती जिल्हापेठ पोलिसांना दिल्यानंतर लागलीच घटनास्थळी पोलिस दाखल झाले. त्यांनी संशयित कृष्णा नरेंद्र पिंगळे (२०, रा. रायसोनी नगर जिजाऊ चौक), मयंक राजेंद्र चौधरी (२७, रा. गणेशवाडी), भावेश अनिल चौधरी (१९, रा. गणेश वाडी) यांना अटक केली तर त्यांच्यासोबत असलेला गोपाल नवल हा तेथून पसार झाला. याप्रकरणी चौघांविरुद्ध पोलिसात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख हे करीत आहे.
हे वाचलंत का ?
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४