संस्थेच्या माध्यमातून विविध स्पर्धा राबवून होतकरू विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती वाटप चे नियोजन करणार – अविनाश जावळे
जळगाव – जागतिक महिला दिनानिमित्त निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान च्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेत महिला दिनाचे औचित्य साधून निबंध स्पर्धा व सुंदर हस्ताक्षर आयोजित करण्यात आली होती ,या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातून १३०० विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता या स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस वितरण सोहळा गुरुवारी रामनवमीला रोटरी भवन,गणपती नगर ला मोठ्या उत्साहात पार पडला , कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी क्रिडाअधिकारी किरण जावळे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून रोटरी मिटडाउन क्लब चे अध्यक्ष मनोज पाटील , उद्योजक रामकीशन वर्मा , शारदा सोनवणे,प्रणेश ठाकूर आदी उपस्थित होते.
खुशी बाहेती या विद्यार्थ्यांनीने स्वागत गीत सादर करून उपस्थित प्रमुख अतिथीचे स्वागत करून प्रमुख अतिथीच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली , कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव धीरज जावळे यांनी सादर करून संस्थेच्या मागील पाच वर्षांपासून सुरू असलेल्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती उपस्थित प्रेक्षक व अतिथींना दिली , कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मनोज पाटील यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यासाठी आयोजित केलेल्या स्पर्धेचे कौतुक केले तसेच उपस्थित पालकांना आव्हान केले की विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देवून त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात यश प्राप्त करू द्याल असे आव्हान आपल्या मनोगतातून केले , यावेळी हजारोंच्या संख्येने पालक उपस्थित होते, स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्याना प्रमुख अतिथी च्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल देवून गौरविण्यात आले , कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी संगीता बाहेती,पूनम ताडे,रत्ना सपकाळे,स्वाती तायडे,सोनाली पाटील,प्रज्ञा जोशी,सुरेश सोनवणे,धीरज जावळे, प्रमोद जावळे, संस्थापक अविनाश जावळे आदींनी परिश्रम घेतले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्जवला महाजन तर आभार संगीता बाहेती यांनी सादर केले .
या शाळांचा झालं सत्कार :- आर्यन इंटरनॅशनल स्कूल,पाळधी ,बालविश्व मराठी प्राथमिक शाळा,वेदांत अकॅडमी, जळगाव पब्लिक स्कूल,थेपडे ग्लोबल लर्निंग स्कूल,असोदा, गुलाबराव पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल,पाळधी,आर्यन स्कूल,कासोदा, अंश कलासेस,साक्षी कलासेस,अरुणोदय स्कूल,लीनेट वेगस मॅडम, टायगर स्कूल, शीतल अकॅडमी पारोळा,सरस्वती कलासेस बोदवड, निःस्वार्थ कलासेस, सरस्वती कलासेस चोपडा,त्रिरत्न अकॅडमी पिंप्री ता धरणगाव , गीतांश कलासेस अडावद, शुभश्री कलासेस जळगाव, बाहेती हायस्कूल जळगाव , द्वाराकबाई थेपडे इंग्लिश स्कूल, म्हसावद, अभिनव स्कूल , अध्यापिका विद्यालय जळगाव, स्वरांश कलासेस, बालविकास विद्यामंदिर , श्री साई कलासेस , बी.यु.न.रायसोनी स्कूल, आदी शाळांचा सत्कार करण्यात आला.
हे वाचलंत का ?
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………