धक्कादायक… अवघ्या तीन महिन्यातच 19 वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या..

Spread the love

प्रतिनिधी। एरंडोल



एरंडोल :- येथील इस्लामपुरा परिसरात रहिवास करीत असलेल्या तीन महिन्यापूर्वीच लग्न झालेल्या एकोणावीस वर्षीय विवाहितेने दुपट्टाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास एरंडोल शहरात घडली.


याबाबत सविस्तर माहिती अशी की शहरातील गांधीपुरा परिसरातील इस्लामपुरा येथे रहिवास करीत असलेले शेख शाहरुख याकूब यांच्या विवाह तीन महिन्यापूर्वी पिंप्राळा जळगाव येथील येथील मुनिरा बी शेख शाहरुख यांच्याशी झाला. शेख शाहरुख याकुब हा घर बांधण्याचे गवंडीकाम करतो. आज सकाळी शाहरुख कामावर जाण्यापूर्वी दोघांमध्ये किरकोळ भांडण झाले. म्हणून शाहरुख याने येथील आपल्या सासू नसिम बी शेख सलिम यांना फोन करून सांगितले की तुमची मुलगी माझ्याशी भांडण करीत आहे इला तुम्ही तुमच्याकडे पिंप्राळा येथे घेऊन जा. असे सांगितले व विवाहितेने पती शाहरुख यास पिंप्राळा येथे जाण्यासाठी भाड्याला पैसे आणून द्या. म्हणून शाहरुखने विवाहितेस भाड्याला पैसे देऊन तो कामावर निघून गेला.


दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास विवाहितेची आई पिंप्राळा येथून एरंडोल येथे मुलीकडे आली असता त्यांच्या अंगणात परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली दिसली. म्हणून घरात आत शिरली असता पहिले कि मुनिरा बी शेख शाहरुख वय 19 वर्षे या विवाहितेने धराचे पंख्याला दुपट्टा बांधुन गळफास आत्महत्या केली.


विवाहितेची आई व परिसरातील नागरिकांनी मुनिरा बी हिला उतरून ऑटो रिक्षाने तात्काळ ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले त्या ठिकाणी डॉक्टरांनी तीस तपासून मयत झाल्याचे घोषित करण्यात आले.डॉ. कैलास पाटील डॉ. मुकेश चौधरी डॉ. तन्मय महाले यांनी शवविच्छेदन करून मयतास नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.


तीन महिन्यापूर्वीच लग्न झालेल्या विवाहितेने आत्महत्या का केली असेल याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
विवाहिता व तिचे पती हे दोघे एकटेच राहत होते.
पती शाहरुख यास कामावर जाऊ दिल्यानंतर मुनिरा बी हिने आत्महत्या का केली असेल अशी चर्चा दिवसभर परिसरात होती.याबाबत एरंडोल पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोहे का अनिल पाटील हे पुढील तपास करीत आहे.

टीम झुंजार