एरंडोल – ०९ रोजी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एरंडोल नगरपालिका अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा अभियान २.०अंतर्गत एरंडोल नगरपालिकाने केलेल्या विविध नाविन्यपूर्ण कामांची पाहणी करण्याकरिता भेट दिली.
जिल्हाधिकारी यांचे प्रथमत: प्रशासक तथा मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी पुष्पगुच्छ,श्रीफळ व वृक्ष देऊन स्वागत केले.त्यानंतर मा.जिल्हाधिकारी यांच्या हस्ते फिल्टर प्लॅन्ट येथे वृक्षारोपण करण्यात आले.तद्नंतर मा.जिल्हाधिकारी यांनी न.पा.च्या वसुंधरा पार्क, रोपवाटीका व उदयानाची पाहणी केली.
तेथून एरंडोल न.पा.ने करण्यात आलेल्या अंजनी नदी पात्राची साफसफाई व नदी पुनरुज्जीवन उपक्रमांची पाहणी करुन समाधान व्यक्त केले व नदी सुशोभिकरणासाठी प्रस्ताव तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले.तसेच न.पा.च्या घनकचरा प्रक्रिया केंद्रास भेट देवून एरंडोल न.पा. मार्फत घरोघरी जावून संकलन करण्यात आलेल्या सुका कचरा यापासून तयार करण्यात आलेले MRF केंद्र व ओला कचऱ्यापासून तयार करण्यात येत असलेल्या खताची पाहणी केली.
तसेच सदरील खताची गुणवत्तेची पडताळणी केली असता सदर खताचे उत्पादनात आणखी वाढ करण्याबाबत मार्गदर्शन केले.याप्रमाणे विविध नाविन्यपूर्ण कामांची पाहणी केली असता यामध्ये समाधान व्यक्त करुन मार्गदर्शन करण्यात आले.सदर भेटीप्रसंगी एरंडोल नगरपालिकाचे कार्यालय अधिक्षक हितेश जोगी,बांधकाम अभियंता देवेंद्र शिंदे, सौरभ बागड, विक्रम घुगे विवेक कोळी, डॉ.अजित भट्ट, सौ.प्रियंका जैन,महेंद्र पाटील, विनोद पाटील, विकास पंचबुध्दे, दिपक गोसावी, भूषण महाजन व इतर सर्व न.पा.कर्मचारी हे उपस्थित होते.