कासोदा येथे चोरांच्या हैदास.

Spread the love

अवघ्या सतरा तासात चोरांच्या आवरल्या मुसक्या…

कासोदा प्रतिनिधी :- शैलेश पुरोहित


कसोदा येथील पोलीस स्टेशन च्या कार्यक्षेत्रात नेहमी गजबलेल्या बिर्ला चौक परिसरात गुरुवारी मध्यरात्री दि. १० फेब्रुवारी २०२२ व ११ फेब्रुवारी २०२२ च्या रात्रीचे १ ते २ वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी बिर्ला चौकातील शेतकरी दामू श्रावण कुंभार हे शेतात गव्हाच्या पिकासाठी पाणी भरण्यास गेले असता तेव्हा त्यांच्या घरी त्यांच्या दोघे पत्नी व एक मुलगी खालच्या रूम मध्ये झोपले होते.

त्यांचा घराच्या वरील मजल्याचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून चोरट्यांनी याचा फायदा घेऊन दुसऱ्या मजल्यावर दुसऱ्याच्या घराच्या छतावरून जाऊन उघड्या असलेल्या दरवाजाने त्यांच्या वरच्या मजल्यावर प्रवेश करून कपाशी विक्रीतून आलेले ६० हजार रुपये हे कुलूप लावलेल्या पत्री कोठीत ठेवलेले होते. त्या कोठीचे कुलूप तोडून त्यातील ६० हजार रु चा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला परत खाली येऊन त्या चोरट्याने खालच्या मजल्यावर झोपलेल्या त्यांच्या मुलीच्या उशाजवळ ठेवलेला रेडमी कंपनीचा पाच हजार रुपये किमतीचा मोबाइलही लंपास केला.

तद्नंतर बिर्ला चौकातील योगिता कृषी केंद्र या दुकानातून ही अंदाजे ५०० ते ७०० रुपये चोरीस गेल्याची तक्रार राजेंद्र रामदास येवले यांनी पोलीस स्टेशनला दिली तसेच इतर दोन ठिकाणी शटर वाकवून कुलूप तोडून पैसे चोरण्याच्या इराद्याने चोरी करण्याचा प्रयत्न केला परंतु चोरट्यांना ४० ते ५० रुपये मिळून आल्याची चर्चा होत आहे.

बिर्ला चौकातील एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोरटा कैद झाल्यामुळे शेख साहिल शेख युसुफ (१९) राहणार कासोदा प्रतिनिधी :- शैलेश पुरोहित वाडा कासोदा याच्या अवघ्या सतरा तासात संध्याकाळी ७ वा. स. फौ. सहदेव घुले पो.कॉ. जितेश पाटील, पो.कॉ. इम्रान पठाण व पो.कॉ. स्वप्निल परदेशी यांनी सीसीटीव्ही फुटेजच्याआधारे आरोपीच्या मुसक्या आवरून आरोपीला अटक केली आहे.

गेल्या ५ जानेवारी रोजी कासोदा आडगाव रस्त्यावर स्वामी समर्थ केंद्रासह चार ठिकाणी चोऱ्या झाल्या होत्या. तशाच आशयाच्या चोऱ्या झाल्याचे आज दिसत आहे. त्याचा कुठल्याही प्रकारे उलगडा झाल्या नसल्याने चोरांनी परत चोरी करण्याचे धाडस दाखवले असता आता शहरात चोरट्यांनी घरांबरोबरच दुकाने देखील फोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.

या प्रकरणी पुढील तपास सपोनि नीता कायटे , पीएसआय नरेश ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ.सहदेव घुले,पो.कॉ.जितेश पाटील,पो.कॉ.इम्रान पठाण , पो.कॉ.स्वप्नील परदेशी हे करीत आहे.
संबंधित गुन्हेगार हा सरईत गुन्हेगार असून त्याच्यासोबत गावातीलच काही विधी संघर्ष बालक असून हे सर्व ( बोन्ड ) स्टिकफास्ट पण्णी मध्ये घेऊन वेगळीच नशा करीत असल्याचे ही बोलले जात आहे , इतकेच नव्हे तर हे सर्वजण गावात छोट्या – मोठ्या चोऱ्यासह पेट्रोल चोरीचे गुन्हे करीत असल्याचे चौका चौकात चर्चिले जात आहे. यांवर पोलीस कर्मचारी अजून काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..!

टीम झुंजार