जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
तुमच्या व्यक्तिमत्वावर लोक खुश होतील. सरकारी कामे मार्गी लागतील. कामातील बदल जाणून घ्यावेत. मौल्यवान वस्तू जपून ठेवाव्यात. आवडीचे पदार्थ चाखाल.
वृषभ :-
जीवनाकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल. साहित्याची आवड जोपासता येईल. भावंडांना बाहेर गावी जाण्याचा योग येईल. मैत्रीतील आपुलकी वाढेल. फार दूरचे विचार करू नका.
मिथुन :-
क्षणिक सौख्याचा आनंद घ्याल. मनातील इच्छा पूर्ण होईल. व्यावसायिक प्रगतीच्या दृष्टीने मार्गक्रमण कराल. व्यापारात चांगला लाभ होईल. कमिशनचा लाभ उठवावा.
कर्क :-
स्त्री वर्गाचा सहवास लाभेल. नवीन मित्रा जोडले जातील. पत्नीचे उत्तम सहकार्य लाभेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. मुलांच्या आनंदाने खुश व्हाल.
सिंह :-
घरासाठी सजावटीच्या वस्तू खरेदी कराल. तुमच्या कलागुणांचे कौतुक केले जाईल. महिलावर्ग मनाजोगी खरेदी करेल. चांगले साहित्य वाचनात येईल. जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल.
कन्या :-
चारचौघांत तुमची कला सादर करता येईल. योग्य विचारांची जोड घ्यावी. धार्मिक साहित्य वाचाल. इतरांना मनापासून मदत कराल. मनात नवीन कल्पना रुजतील.
तूळ :-
अचानक धनलाभ संभवतो. लॉटरीचे तिकीट घ्याल. घरगुती प्रश्न समजून घ्यावेत. अपचनाचा त्रास जाणवेल. हातातील कामे पूर्ण होतील.
वृश्चिक :-
पत्नीचे प्रेमळ सौख्य लाभेल. नोकरीच्या ठिकाणी तुमचा दबदबा वाढेल. कामातून आत्मिक समाधान लाभेल. व्यवसाय वृद्धीचा मार्ग आखावा. मुलांचा खोडकरपणा वाढेल.
धनू :-
कौटुंबिक खर्चाचे गणित नव्याने मांडावे. मित्र मंडळींचा गोतावळा जमवाल. बोलण्याच्या भरात नवीन जबाबदारी अंगावर घ्याल. हाताखालील लोकांकडून कामे करून घ्याल. जुगाराची आवड जोपासाल.
मकर :-
पित्ताचा विकार जाणवेल. कामाचा फार ताण घेऊ नका. नातेवाईकांशी मतभेद संभवतात. स्वत: मध्ये काही बदल करून पहावेत. कामातील अडथळे प्रयत्नपूर्वक दूर करावेत.
कुंभ :-
सामाजिक बांधीलकी जपावी. वादावादीत सहभाग घेऊ नका. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. धाडसाने कामे पूर्ण कराल. तुमची हिंमत वाढीस लागेल.
मीन :-
मित्रांचा रोष वाढवून घेऊ नका. अधिकारी व्यक्तीचा सल्ला विचारात घ्या. मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. मानसिक चंचलता जाणवेल.
हेही वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






