या साहित्य संमेलनाने बहुजन समाजाला दिशा मिळाली -डॉक्टर यशवंत मनोहर

Spread the love


दोन दिवसीय राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचा समारोप

जळगाव :- तिसरे राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन जळगाव येथे ऐतिहासिक पद्धतीने अत्यंत जल्लोषात दि. 3 एप्रिल रोजी संपन्न झाले. या साहित्य संमेलनाने बहुजन समाजाला दिशा मिळाली आहे. बहुजन समाजाच्या अनेक विचारवंतांनी, अभ्यासकांनी, श्रोत्यांनी या साहित्य संमेलनाला उपस्थिती दिली आहे. त्यातून मोठे वैचारिक मंथन घडून आले आहे. बहुजन समाजान खरी समता लक्षात घेऊन येणाऱ्या काळात प्रचंड बदल होणार आहेत, असा आशावाद संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर यशवंत मनोहर यांनी व्यक्त केला.

आज दिवसभरामध्ये सकाळच्या सत्रामध्ये ‘मी रमाई बोलते’ याचे सुंदर सादरीकरण वैशाली भालेराव यांनी केले. त्या प्रसंगी उपस्थित महिलांना अश्रू अनावर झाले. ‘कवी जेव्हा गाऊ लागतो’ हे कवींचे सत्र संपन्न झाले. त्याचे अध्यक्ष डॉक्टर अरुण अहिराव होते. यात दहा कवींनी कविता गायन केले. या सत्राचे सूत्रसंचालक बी. आर. पंचांगे होते.


दुपारच्या सत्रामध्ये कवी संमेलन संपन्न झाले. या सत्राचे अध्यक्ष साहित्यिक डॉक्टर मिलिंद बागुल होते व सूत्रसंचालक राजेंद्र पारे आणि नवनाथ रणखांबे होते. या सत्रात 15 कवींनी कविता सादरीकरण केल्या. दुपार सत्रामध्ये संपन्न झालेल्या परिसंवादामध्ये भारतीय संविधान संरक्षण काळाची गरज व 22 प्रतिज्ञांचा प्रचार प्रसार काळाची गरज इत्यादी सत्र पार पडले. या सत्राचे अध्यक्ष डॉक्टर धनराज डाहट होते. या सत्राचे सूत्रसंचालन समाधान जाधव व कैलास पवार यांनी केले. डॉक्टर सत्यजित साळवे, जळगाव, प्राध्यापक रमेश साबळे, बुलढाणा, प्राध्यापक अविनाश कोल्हे, पुणे इत्यादी व त्यांनी विषयाच्या अनुषंगाने आपली भूमिका मांडली. त्यानंतर धम्म प्रचारामध्ये महिलांची भूमिका या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्राचे अध्यक्ष स्थान डॉक्टर संघमित्रा जाधव, कल्याण यांनी भूषविले. दीपश्री बलखंडे यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले. या सत्रामध्ये विद्या भोरजारे, बोईसर, सविता भोसले पुणे इत्यादींनी वक्ता म्हणून आपले मनोगत व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्त्या वंदना भामरे या सत्राच्या मान्यवर म्हणून उपस्थित होत्या.


बौद्ध साहित्य वर्तमान आणि भविष्य या विषयावर व्याख्याते सुनील सोनवणे यांनी अभ्यासपूर्ण भाषण केले. ‘भारतीय महिला काल आज आणि उद्या’ या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर कविता सोनवणे होत्या. वक्त्या म्हणून प्राध्यापिका मनीषा देशमुख, सरिता वासवानी होत्या. मान्यवर म्हणून अनिता सरदार व सपना रावलानी उपस्थित होत्या. अश्विनी कोळी मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले. प्रसिद्ध सूत्रसंचालक प्रमोद आठवले यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले.
दोन दिवसीय राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचा अतिशय जल्लोषामध्ये समारोप बबन कांबळे साहित्य नगरी या ठिकाणी झाला. समारोपिय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर यशवंत मनोहर होते . स्वागत अध्यक्ष प्राध्यापक भरत शिरसाठ, संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड, डॉक्टर धनराज डाहट व राज्य समन्वय समितीचे अध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे, साहित्यिक जयसिंग वाघ, ज्येष्ठ कवी शशिकांत हिंगोणेकर समारंभ प्रसंगी उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड यांनी संमेलनाच्या यशस्वीतेबद्दल प्रचंड समाधान व्यक्त केले. त्याबद्दल त्यांनी साहित्य संमेलनाच्या सर्व समित्यांचे मनःपूर्वक आभार मानले. जळगाव जिल्हा बौद्ध शिक्षक संघ आणि सर्व तालुका समन्वय समिती यांमुळे हे साहित्य संमेलन यशस्वी झाले. त्यामुळे मी त्यांना वंदन करतो, असे मत स्वागताध्यक्ष प्रा. भरत शिरसाठ यांनी व्यक्त केले. समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैय्यासाहेब सोनवणे, एरंडोल यांनी केले. या साहित्य संमेलनाचे उत्कृष्ट नियोजन करून त्याकरिता 45 सभा विविध ठिकाणी पार पाडून संमेलन यशस्वी केल्याबद्दल तसेच संविधान सन्मान रॅली व धम्म जागृती रॅली अतिशय भव्य पद्धतीने नियोजन केल्याबद्दल संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्राध्यापक भरत शिरसाठ यांचा डॉक्टर यशवंत मनोहर, प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड, डॉक्टर धनराज डाहट, मुकुंदभाऊ सपकाळे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर सत्कार करण्यात आला. आंबेडकर चळवळीमध्ये अखंड आयुष्य

दिल्याबद्दल रामचंद्र निकम यांचा सन्मानपत्र देऊन संमेलनाध्यक्ष डॉक्टर यशवंत मनोहर व मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर सन्मान करण्यात आला.
समारोप प्रसंगी संमेलनाध्यक्ष डॉक्टर यशवंत मनोहर, प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर धनराज डाहट, संस्थेचे अध्यक्ष प्रा. शुक्राचार्य गायकवाड, राज्य समन्वय समिती अध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे, संयोजन समिती प्रमुख साहित्यिक जयसिंग वाघ, साहित्यिक शशीकांत हिंगोणेकर, कार्याध्यक्ष जयवंत सोनवणे, उपाध्यक्ष सुनील पवार, उपाध्यक्षा विद्या भोरजारे, सचिव डॉक्टर सुरेंद्र शिंदे, उपसचिव दीपश्री बलखाडे, बौद्ध साहित्य परिषद महाराष्ट्र उपसमिती अध्यक्ष भटू जगदेव, कार्याध्यक्ष नवनाथ रणखांबे, सचिव भीमराव रायभोळे, केंद्रीय सदस्य कांतीलाल भडांगे, बी. आर. पंचांगे, बी. जे. कांबळे, कार्यवाह समितीचे प्रमुख डॉक्टर अशोक सैंदाणे, बौद्ध साहित्य परिषद जळगाव पश्चिम विभाग जिल्हाध्यक्ष,राजेंद्र पारे, शिक्षक समन्वय समितीचे प्रमुख धनराज मोतीराय, प्राध्यापक समन्वय समितीचे प्रमुख डॉक्टर संदीप कोतकर, धम्मजागृती रॅली समिती प्रमुख चैतन्य नन्नवरे, स्टेज समिती प्रमुख उदय सपकाळे, भोजन समिती प्रमुख भालचंद्र बावस्कर, निवास समिती प्रमुख सुरेश सपकाळे, कर्मचारी समिती प्रमुख प्राचार्य सतीश मोरे, सविधान रॅली समिती प्रमुख सतीश गायकवाड, अर्थ समिती सहसचिव विवेक सैंदाणे, स्मरणिका संपादन समितीच्या सहसंपादिका वर्षा शिरसाठ, सदस्य अजय भामरे आणि सोपान भवरे, नियोजन समिती सदस्य महेश तायडे इ. उपस्थित होते. धनराज मोतीराय यांनी समारोप कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले. तिसरे राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन प्रचंड यशस्वी झाली असून या साहित्य संमेलनाचे स्मरण इतिहासात कोरले जाणार आहे, अशा पद्धतीच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. संमेलनासाठी परिश्रम घेणाऱ्या नियोजन समितीचा यावेळेस सत्कार करण्यात आला. प्रत्येक तालुका समन्वय समिती प्रतिनिधींना तसेच संविधान रॅली व धम्म जागृती रॅली करिता निवडलेल्या गावांच्या प्रतिनिधींना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व स्मरणिका देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. डॉक्टर अशोक सैंदाणे व विनोद सपकाळे यांनी ओपन अँकर म्हणून भूमिका निभवीली.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार