जळगाव: सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव, धरणगाव आणि भडगाव येथून दुचाकी लांबविणा-या दीपक सुमा-या बारेला (२७, रा.कर्जाणा, ता. चोपडा) याला चोपडा येथून बेड्या ठोकल्या असून त्याच्याजवळून तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. पुढील कार्यवाहीसाठी त्याला जळगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
चोपडा तालुक्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे चोरट्यांचा शोध घेवून त्यांचा अटक करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी केल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाकडून दुचाकी चोरट्यांचा शोध सुरू होता. दीपक बारेला नामक व्यक्ती हा विना क्रमांकाची दुचाकी घेवून चोपडा शहरात फिरत असल्याची माहिती सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.
चोपड्यातील कारगिल चौकात पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने पथकाला जळगाव, धरणगाव आणि भडगाव येथील तीन दुचाकी काढून दिल्या. ही कारवाई पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पाटील, अश्रफ शेख, दीपक पाटील, प्रवीण मांडोळे, परेश महाजन, हेमंत पाटील, प्रमोद ठाकूर आदींच्या पथकाने केली आहे.
आरोपी दीपक बारेला यांचे कडून जप्त करण्यात आलेल्या मोटार सायकल चे वर्णन १)MH 19 CA 6777 काळ्या रंगाची बजाज कंपनीची पल्सर मोटार सायकल. २)MH 19 BH 4435 लाल रंगाची होंडा कंपनीची सी डी डीलक्स मोटार सायकल. ३)MH 19 DD 6523 काळ्या रंगाची होंडा कंपनीची शाईन मोटार सायकल. या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
हे देखील वाचा
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.
- पोलखोल! बनावट एडिशनल एसपी बनून आली पोलीस ठाण्यात पोलिसांनी केलं सॅल्यूट;पण एक छोटीशी चूक होताच पोलिसांनी केला महिलेचा पर्दाफाश.
- एरंडोल येथे संविधान दिवस उत्साहात संपन्न; “घर घर संविधान” चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४