जळगाव : सध्या महाराष्ट्रात महिला लैंगिक अत्याचाराची घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच जळगाव शहरातील एका परिसरात दूधात गोळ्या देवून विवाहितेवर झोपेतच अत्याचार (Jalgaon News) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस (Police) ठाण्यात एका जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे..
जळगाव शहरातील विवाहितेने रामानंदनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार शहरातील एका भागात वास्तव्यास आहे. जयदीप सुरेश पाटील याने ४ जानेवारी २०२२ ते ३ एप्रिल २०२३ या दरम्यान वेळावेळी गरम दूधात गोळ्या टाकून ते दूध विवाहितेला दिले. त्यानंतर झोपेत विवाहितेसोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केले. हा प्रकार जेव्हा विवाहितेला कळाला, तेव्हा जयदीप याने विवाहितेला तिच्या मुलाचा व पतीचा खून करण्याची धमकी दिली.
दरम्यान जयदीप याने विवाहितेला मारहाण सुध्दा केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घडल्या प्रकाराबाबत विवाहितेने मंगळवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन जयदीप पाटील याच्याविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक रोहिदास गभाले हे करीत आहेत.
हे वाचलंत का ?
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम