सम्राट सामाजीक गृप चा उपक्रम..
पिंप्री खु प्रतिनिधी / सतिष शिंदे सर
धरणगाव :- एप्रिल महिन्यात महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती येत असून जिल्ह्यात विविध ठिकाणी जन्मोत्सव औचित्य साधून नवनविन व सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे महामानवांच्या जयंती निमित्ताने 7 ते 14 एप्रिल या कालावधीत वाचन सप्ताह विविध लेखी स्पर्धा , चित्रकला स्पर्धा , सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे .
वाचनाने महापुरुषांच्या जीवनाचा अभ्यास , तसेच आपल्या साठी केलेले बहुमोल कस्ट , समाजघडणी मध्ये असलेले महत्त्वाचे योगदान आजच्या पिढीला ज्ञात व्हावे या दृष्टीने सम्राट गृप ने स्पर्धांचे आयोजन केले आहे. स्पर्धा सर्व विद्यार्थी युवकांना खुली स्वरूपात असल्याने जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा असे आवाहन सतिष शिंदे सर यांनी केले आहे.
हे वाचलंत का ?
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.