निंभोरा प्रतिनिधी / परमानंद शेलोडे
निंभोरा :- येथील दि.७ एप्रिल रोजी आदिवासी कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचा मेळावा जळगाव येथे माजी मंत्री दशरथ भांडे मेळाव्याचे अध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या उपस्थितीत पार पडला तसेच जळगाव जिल्हा पदाधिकारी यांच्या नियुक्ती जाहीर करण्यात आले आहे तालुक्यातील निंभोरा येथील युवा कार्यकर्ते संदीप तुकाराम महाले (कोळी )यांनी आतापर्यंत केलेल्या सामाजिक धार्मिक कार्याची दखल घेत त्यांची रावेर तालुका आदिवासी कोळी महासंघाच्या युवक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येऊन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आले.
याप्रसंगी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रभाकर सोनवणे माजी नगराध्यक्ष छत्रभुज सोनवणे राज्य संघटक प्रशांत तारळे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अण्णासाहेब फुनगे, बाळासाहेब सैंदाणे ,जिल्हा पूर्व अध्यक्ष संजय कांडेलकर ज्येष्ठ मार्गदर्शक गंभीर उन्हाळे ,रवींद्र नन्नवरे ,महासचिव मनोहर कोळी , युवक अध्यक्ष नामदेव कोळी ,प्रशांत सोनवणे, महिला आघाडीच्या सौ. सुनीता तायडे आदी उपस्थित होते सूत्रसंचालन प्रल्हाद सोनवणे तर आभार शंभू देवरे यांनी केले
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






