महात्मा फुले जयंतीनिमित्त एरंडोलला विविध कार्यक्रम, मोटार सायकल रॅली,अभिवादन पहा व्हिडिओ

Spread the love

एरंडोल– येथील महात्मा फुले युवा क्रांती मंचच्यावतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.महात्मा फुले यांच्या पुतळ्यास प्रांताधिकारी विनय गोसावी,तहसीलदार सुचिता चव्हाण,पोलीस निरीक्षक सतीश गोराडे,मुख्याधिकारी विकास नवाळे,माजी नगराध्यक्ष देविदास महाजन यांचेसह विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या पदाधिका-यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

तसेच महात्मा फुले युवा मंचचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि युवकांनी शहरातून भव्य मातर सायकल रॅली काढली.प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्याहस्ते रॅली चा शुभारंभ करण्यात आला.रॅलीत सहभागी झालेल्या युवकांच्या मोटरसायकलवर लावण्यात आलेले महात्मा फुले यांचे छायाचित्र असलेले पिवळ्या रंगाचे ध्वज नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.यावेळी युवक विविध घोषणा देत होते.रॅलीचे ठिकठीकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले.यावेळी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला.

महात्मा फुले,सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीवर ठिकठीकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली.मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.यावेळी उपस्थित कार्यकर्ते जय ज्योती,जय क्रांती अशा घोषणा देत होते.मिरवणूक शांततेत पार पडली.कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, रमेश परदेशी,रवींद्र महाजन,राजेंद्र चौधरी,किशोर निंबाळकर, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,निवृत्त तहसीलदार अरुण माळी,युवा उद्योजक समाधान पाटील,कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी विजय महाजन,तालुकाध्यक्ष योगेश महाजन,

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नाना महाजन,शिवसेनेचे शहरप्रमुख आनंदा चौधरी (भगत),विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष दुर्गादास महाजन,दादासाहेब पाटील महाविद्यालयाचे अध्यक्ष अमित पाटील,युवासेनेचे जिल्हा समन्वयक अतुल महाजन,शहरप्रमुख प्रमोद महाजन,माजी नगरसेवक डॉ.नरेंद्र पाटील,अभिजित पाटील,संजय महाजन,पी.जी.चौधरी,आय.जी,माळी, माजी उपनगराध्यक्षा आरती महाजन,समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन,रुपेश माळी,माजी उपनगराध्यक्ष कुणाल महाजन यांचेसह राजकीय,सामाजिक व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमासाठी महात्मा फुले युवा मंचच्या पदाधिका-यांनी सहकार्य केले.

हे देखील वाचा

टीम झुंजार