शरीरसुखाची मागणी, सेक्सला नकार दिल्याने MBBSच्या विद्यार्थिनीची हत्या, सेल्फीने झाली गुन्ह्याची उकल.

Spread the love


मुंबई : एमबीबीएसचे शिक्षण घेणारी पालघर येथील बेपत्ता विद्यार्थिनी सदिच्छा साने हत्याप्रकरणात पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र सादर केल्यानंतर काही नव्या गोष्टी समोर आल्या आहेत.सदिच्छा साने ही शेवटची मिथ्थू सिंग याच्याबरोबर वांद्रे येथील बँड स्टँडवर दिसली होती, या एका गृहीतकावर आरोपनिश्चिती आणि तपास करण्यात आला होता. मिथ्थूने सदिच्छाकडे शरीरसुखाची मागणी केली. मात्र, सदिच्छाने सेक्स करायला नकार दिल्याने मिथ्थूने तिची हत्या केली, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या गुन्ह्याची उकल करण्यासाठी काही धागेदोरे फार महत्त्वाचे ठरले आहेत.

नेमकं प्रकरण काय? सदिच्छा साने ही 29 नोव्हेंबर 2021 पासून गायब आहे. सदिच्छा साने त्यादिवशी सकाळी 9 वाजून 58 मिनिटांनी विरार रेल्वे स्थानकावर लोकलमध्ये चढली आणि अंधेरीला उतरली, कारण तिला जेजे हॉस्पिटलमध्ये दुपारी दोन वाजता प्रिलिमसाठी हजर व्हायचे होते. तिथून ती दुसर्‍या ट्रेनमध्ये चढली आणि वांद्रे येथे उतरली तिथून तिने रिक्षाने बँडस्टँड गाठलं. बेपत्ता होण्यापूर्वी तिने संपूर्ण दिवस त्याच भागात घालवल्याचा अंदाज आहे.पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करताना जवळपास 100 जणांचे जबाब नोंदवले होते. यामध्ये मिथ्थू सिंगच्या चायनीजच्या दुकानात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. यापैकी एकाने पोलिसांना सांगितले की, मी जब्बार अन्सारी याला मिथ्थूशी चारवेळा फोनवर बोलताना ऐकले. तेव्हा जब्बार मिथ्थूला, ‘तू तिच्यासोबत सेक्स केलास का?’, ‘तुला बेडशीट मिळाली का?’, असे प्रश्न विचारत होता.

आणखी एका कर्मचाऱ्याने मिथ्थू सदिच्छाबद्दल वाईट भावनेने बोलत असल्याचेही सांगितले होते.एक सेल्फी अन् नार्को टेस्ट अहवाल नार्को टेस्टदरम्यान, सिंगने कबूल केले की त्याला मृत सदिच्छासोबत लैंगिक संबंध ठेवायचे होते. मात्र, तिने नकार दिला. दुसरा महत्त्वाचा संकेत म्हणजे 29 नोव्हेंबर 2021 रोजी पहाटे 3.45 वाजेपर्यंत आपण सानेसोबत असल्याचे सिंग याचे म्हणणे आहे. पहाटे 2.35 वाजता दोघांनी सेल्फी घेतल्याचे फोटोग्राफिक पुरावे पोलिसांकडे होते. नार्को टेस्टमध्ये आरोपीला नऊ प्रश्न विचारण्यात आले.

दुसरा सुगावा आरोपींच्या हालचालींशी संबंधित होता. नार्को टेस्टपूर्वी, 2.35 पर्यंत पीडितेसोबत आरोपी उपस्थित होता ह्याचा पुरावा म्हणून फक्त एक सेल्फी होता. मात्र, पहाटे 3.45 वाजेपर्यंत तो तिच्यासोबत होता, अशी कबुली आरोपीने दिली. पुढील तपासामुळे एका साक्षीदाराचा शोध लागला.ज्याने रात्री उशिरा पीडितेला वांद्रे बँड स्टँडवर पाहिले होते आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये सिंग समुद्राकडे धावताना दिसत आहे. या निष्कर्षांच्या आधारे, अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की सिंग यांनी सानेचा मृतदेह बेशुद्ध पडल्यानंतर समुद्रात फेकून दिला. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “तो पहाटे 4.30 वाजेपर्यंत जागा होता. त्याने मृत व्यक्तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि तिचा नंबर 11 वेळा डायल केला, असा डिजिटल पुरावा आहे.”

टीम झुंजार