नागपूर :- देशात कठोर कायदे असतानाही हुंडाबळीचे प्रकार थांबताना दिसत नाही. माहेरहून हुंडा आणण्यासाठी विवाहितेचा मानसिक आणि शाररीक छळ केला जातो. नकार दिल्यास अगदी जीवे मारण्यापर्यंत प्रकरण जाते.
नागपूरमध्येही असाच एक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार वाचल्यानंतर तुम्हालाही संताप आल्याशिवाय राहणार नाही. हुंड्यासाठी पतीने चक्क आपल्या बायकोच्या आंघोळीचा व्हिडिओ शूट केला.
हुंड्यासाठी आपल्या बायकोच्या आंघोळीची व्हिडिओ क्लिपिंग बनवून तिला ब्लॅक मेल करणाऱ्या आरोपी पती विरोधात नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी पती आणि पत्नीचे हे दुसरे लग्न असून नवऱ्याला व्यवसायासाठी पैसे हवे असल्याने त्याने हा किळसवाणा प्रकार केल्याचं तक्रारीत नमूद केलं आहे.
विशेष म्हणजे पतीच्या या कृष्ण कृत्याला त्याच्या आई वडिलांचा देखील पाठिंबा असल्याची माहिती आहे. पैश्याची हवास माणसाला कुठल्या स्तरावर नेईल याच हे उदाहरण असून लग्नावेळी 4 लाख रुपयांचे दागिने दिले.
मात्र, आरोपी अमित अग्रवाल त्यावर समाधानी नव्हता. त्याने पत्नीसोबत वेगळे राहत असताना पत्नीची आंघोळ करताना व्हिडिओ क्लिपिंग बनविली. माहेरून पैसे न आणल्यास ही क्लिपिंग सोशल मीडियावर वायरल करण्याची धमकी देऊ लागला. आरोपीच्या त्रासाने पीडितेचा दोन वेळा गर्भपात देखील झाला. त्रास असह्य झाल्याने पीडीतेने मानकापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






