जरंडी (साईदास पवार)दि.१४…येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने वक्तृत्व स्पर्धेचे शुक्रवारी (दि.१४) आयोजन करण्यात आले यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साईदास पवार, माजी पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे यांचा हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली वक्तृत्व स्पर्धेत वीस ते पंचवीस चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता
यावेळी स्पर्धेचा निकाल शिक्षक विलास वालदे यांनी जाहीर करून तिसरी ते पाचवी या प्राथमिक गटात मिसबा शेख( प्रथम),उन्नती शेख(द्वितीय) आणि प्रांजळ गुंजाळ(तृतीय) तर सहावी ते आठवी या गटात पायल मोरे(प्रथम) कोमल बाळनाथ(द्वितीय) तर अंकिता मोरे(तृतीय) या प्रमाणे मुख्याध्यापक बाळासाहेब सुळ,साईदास पवार,संतोष सोनवणे भिवा चव्हाण संजीवन सोनवणे यांचा पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळी शिक्षक भुपेंद्र जांभूळकर, हितेश मेश्राम शिल्पा चौधरी, विलास वालदे आदींनी पुढाकार घेतला…
हे देखील वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






