प्रतिनिधी / सतिष शिंदे सर
पिंप्री खु ता धारणगाव :- येथील सम्राट गृप च्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रबोधन सप्ताह चे आयोजन करण्यात आले होते . दि 14 एप्रिल 2023 रोजी जाहीर भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करून महापुरुषांच्या विचार धारेचा जागर करण्यात आला .
गायक जयसिंग खंडारे यांनी व पथकाने जोरदार व जल्लोषात गीते सादर करत महापुरुषांच्या विचारांची गुंफण केली . सर्वप्रथम बोद्ध विहार परिसरातुन शिस्तबद्ध पध्दतीने युवक व महिला यांची रॅली गावातून नियोजित कार्यक्रम ठिकाणी आली . बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांचे शिस्त आचरण ने सर्वांचे लक्ष वेधले . पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून सर्व बांधवांनी महापुरुषांना वंदन केले . प्रसंगी सर्व महिलांनी प्रतिमेचे माल्यार्पण केले.

यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटील , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पी सी पाटील , पाळधी गटाचे जि प सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील , मा पंचायत समिती सभापती अनिल पाटील , ऍड योगेश गजरे , आदी उपस्थित होते.तसेच पिंप्री खु येथील ग्रामपंचायत सरपंच ,सदस्य , समस्त नागरिक , तरुण आदी बहुसंख्येने उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सम्राट गृप च्या सर्व कार्यकर्ते यांनी एकीने काम करत 132 वी भीमजयंती उत्साहात साजरी केली. प्रेक्षकांनी कलाकारांना भरपूर दाद देत कौतुक केले. सूत्रसंचालन सतिष शिंदे यांनी केले.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






