मुंबई : सोशल मीडिया ही एक मनोरंजनाची दुनिया आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण येथे दिवसेंदिवस काहीतरी नवीन गोष्टी पाहायला मिळतात. ज्या लोकांना कधी हसवतात, तर कधी आश्चर्यचकीत करतात.म्हणून तर असे व्हिडीओ पाहण्यात लोकांचा कसा व्हिडीओ वाया जातो, हे त्यांचं त्यांनाच कळत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडीओ एका महिलेचा आहे, जिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात एका जवळील व्यक्तीने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला.
या काळात जे घडलं ते खरंच अंगावर काटा आणणारं आहे. हे संपूर्ण प्रकरण सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं आहे. एका रेल्वे स्थानकावर लोकांची थोडीफार गर्दी दिसत आहे. लोक ट्रेनची वाट पाहात असतात.
तितक्या प्लॅटफॉर्मच्या जवळ ट्रेन येते. हे पाहताच एक तरुणी रेल्वेच्या ट्रॅकवर उडी मारण्यासाठी धावते. तिचं वागणं जवळ उभ्या असलेल्या व्यक्तीला विचित्र वाटतं. ही तरुणी ट्रेनसमोर उडी मारणार तितक्यात ही जवळील व्यक्ती त्या महिलेला पकडते आणि मागे खेचते.
या दरम्यान महिलेला वाचवणारी व्यक्तीही प्लॅटफॉर्मवर खाली पडते. पण तरीही ती व्यक्ती हार मानत नाही आणि या तरुणीला झोपूनच मागे खेचते. हे संपूर्ण प्रकरण अंगावर काटा आणणारं आहे. पण नशिबाने या तरुणीला काही झालं नाही.
या सगळ्या प्रकारामुळे तरुणीसोबत त्या व्यक्तीचाही जीव जाऊ शकला असता. पण अनर्थ टळला आणि त्यांचे प्राण वाचले आहेत. हे संपूर्ण दृष्य पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत.
हा व्हिडीओ नक्की कुठला आहे हे कळू शकलेलं नाही. पण हा व्हिडीओ cctvidiots नावाच्या ट्विटर यूजरने शेअर केला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला 15 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर अनेकांच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर अनेक यूजर्स हा व्हिडीओ शेअर करत आहेत. या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे की, हा खूप धोकादायक व्हिडीओ आहे.
हे देखील वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






