एरंडोल-येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती,पंचशील मित्र मंडळ व विविध दलित संघटनांच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोटर सायकल रॅली, मिरवणूक यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमास सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आमदार चिमणराव पाटील,भाजपचे जनजातीय क्षेत्राचे प्रमुख अॅड.किशोर काळकर,प्रांताधिकारी विनय गोसावी,नूतन प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार सुचिता चव्हाण,पोलीस निरीक्षक सतीश गोराडे,सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे,उपनिरीक्षक शरद बागल,पालिकेचे प्रशासक विकास नवाळे,माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी,देविदास महाजन,रवींद्र महाजन, राजेंद्र चौधरी,दादासाहेब पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रा.मनोज पाटील,
बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते डॉ.के.ए.बोहरी, अंग्लो उर्दू हायस्कूलचे अध्यक्ष जहिरोद्दिन शेख कासम यांचेसह विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या पदाधिका-यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण तहसिलदार सुचिता चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले.प्रा.नरेंद्र गायकवाड यांनी सुत्रसंचलन केले.सकाळी दहा वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली.सायंकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली.शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.तसेच मिरवणुकीवर ठिकठीकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली.

मिरवणुकीत आमदार चिमणराव पाटील व पदाधिकारी सहभागी झाले होते.मिरवणुकीत सहभागी झालेले युवक,महिला यांच्या हातातील निळे ध्वज सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.मिरवणूक शांततेत पार पडली.पोलीस निरीक्षक सतीश गोराडे,सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे,उपनिरीक्षक शरद बागल यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस व गृहरक्षक दलाच्या जवानांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष एस.आर.पाटील,सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे

जिल्हा सरचिटणीस राजेंद्र शिंदे,आर.डी.पाटील,कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी विजय महाजन,तालुकाध्यक्ष योगेश महाजन,मोहन चव्हाण,निवृत्त तहसीलदार अरुण माळी,शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवी जाधव,शहरप्रमुख आनंदा चौधरी (भगत),उद्योजक राहुल तिवारी,विजय जाधव,संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष संभाजी पाटील,माजी नगरसेवक अशोक चौधरी,डॉ.सुरेश पाटील,जगदीश ठाकूर,पुरवठा निरीक्षक संदीप निळे,ईश्वर बिर्हाडे,चिंतामण पाटील, पी.जि.चौधरी, डॉ.फरहाज बोहरी यांचेसह विविध राजकीय,सामाजिक व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.कार्यक्रमस्थळी डॉ.संभाजीराजे पाटील फाउंडेशनतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित माहिती चित्ररथाद्वारे देण्यात आली.कार्यक्रमासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील सैंदाणे,ईश्वर बी-हाडे,धनंजय खैरनार,अतुल सोनवणे.कैलास गायकवाड,भैय्या अहिरे,मोहन सैंदाणे,संघरत्न गायकवाड,आकाश अहिरे,प्रसन्नजित सोनवणे,प्रेमराज गायकवाड,छोटू बेहरे,नितीन बोरसे,सागर बोरसे,नरेंद्र सैंदाणे,पंकज बेहरे,विजय गव्हाणे,विजय गायकवाड,लखन बनसोडे यांचेसह पदाधिका-यांनी सहकार्य केले.

दादासाहेब पाटील महाविद्यालय-
येथील यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ संचालित दादासाहेब पाटील महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.प्राचार्य ड.अनिल पाटील यांच्याहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी उपप्राचार्य डॉ.अरविंद बडगुजर,माजी प्राचार्य एन.ए.पाटील,उपप्राचार्य प्रा.आर.एस.पाटील,कुलसचिव गिरीश वेताळे,प्रा.आत्माराम चिमकर,प्रा.के.जे.वाघ,विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.हेमंत पाटील यांचेसह कर्मचारी उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.नरेंद्र तायडे यांनी प्रास्ताविक केले.सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.विजय गाढे यांनी आभार मानले.कार्यक्रमास महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.शर्मिला गाडगे यांचेसह कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते.

एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ.-
येथील एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रामनाथ हिरालाल जाजू प्राथमिक विद्या मंदिरात मुख्याध्यापिका जयश्री कुलकर्णी यांच्याहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
रा.ति.काबरे विद्यालय-येथील रामनाथ तिलोकचंद काबरे विद्यालयात मुख्याध्यापिका रोहिणी मानुधने यांच्याहस्ते प्रतिमापूजन करून पुष्पहार आन करण्यात आला.कार्यक्रमास पर्यवेक्षक अजय मालू,श्रीमती शारदा पाटील यांचेसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
न्यू इंग्लिश स्कूल- येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्राचार्या सरला विंचूरकर,उपप्राचार्या सरिता पाटील यांच्याहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमास शिक्षक व वद्यार्थी उपस्थित होते.
सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघ- येथील सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघात अध्यक्ष तथा निवृत्त तहसीलदार अरुण माळी यांच्याहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी उपाध्यक्ष जाधवराव जगताप,सचिव विनायक कुलकर्णी,संचालक पी.जी.चौधरी यांचेसह संचालक,सदस्य व ज्येष्ठ नागरिक उस्थित होते.
हे देखील वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






