मोकाट कुत्र्यांचे बंदोबस्त करा मुख्याधिकारी यांना नागरिकांचे निवेदन.

Spread the love


प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल :-संपूर्ण एरंडोल शहरासह मुल्लावाडा परिसरामध्ये अनेक कुत्र्यांनी हैदोस माजवला असून लहान मुलांसह शेळ्या व बकऱ्यांनाचावा घेतला असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिनांक 14 फेब्रुवारी रोजी मुल्ला वाडा परिसरातील नागरिक व महिलांनी मुख्याधिकारी विकास नवाळे यांना लेखी निवेदन देऊन मोकाट कुत्र्यांचे बंदोबस्त करण्याचे विनंती केलेली आहे सदर परिसरामध्ये अनेक मोकाट पिसाळलेले कुत्रे असून गेल्या पंधरा दिवसापासून अनेक लहान मुलांसह बकऱ्या शेळ्या यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांना जखमी केले असून सदर कुत्र्या पासून जनावरांसह माणसांचे जीव धोक्यात आलेले आहेतरी सदर कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावाअसे निवेदन मुल्लावाडा परिसरातील नागरिक मजहर पठाण काँग्रेसचे अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष कलीम शेख युवा कार्यकर्ते असलम शेखनाजिम शेख भुऱ्या शेख यांचा सह जखमी मुलींना घेऊन अनेक महिलांनी नगरपालिकेत निवेदन दिले.


संपूर्ण एरंडोल शहरात मोकाट व पिसाळलेले कुत्रे हे झुंड करून फिरत असतात. यामुळे शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळी हे मोकाट असलेले कुत्रे रस्त्याच्या मधोमध बसलेले असतात एखाद नागरिक दुचाकीने जात असताना अचानक भूकतात किंवा त्या नागरिकास चावा घेतात त्यामुळे या दुचाकी स्वार नागरिकांचा कधी कधी अपघात होतो.


झुंड करून फिरत असलेल्या कुत्र्यांमुळे शाळेत जणारे मुले मुलीं खूप घाबरत आहे. यामुळे पालकांना आपल्या पाल्यांना सोबत घेऊन शाळेत सोडावे जावे लागत आहे.
मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा अशी शहरवासीय तर्फे मागणी करण्यात येत आहे.

टीम झुंजार