अमरनाथ यात्रा 1 जुलै 2023 पासून सुरु होईल. आणि ही यात्रा 31 ऑगस्टला संपेल. म्हणजेच अमरनाथची यात्रा 62 दिवस चालणार आहे. या यात्रेसाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी करु शकता
अमरनाथ यात्रेसाठी प्रवाशांना पूर्ण सुविधा देण्यात येणार आहेत. घरापासून ते पिण्याचे पाणी, वीज आणि सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार आहे. अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना हवामानाची माहितीही दिली जाईल. श्री अमरनाथजी साइन बोर्डखाली सकाळी आणि संध्याकाळी आरतीचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला jksasb.nic.in वर जावे लागेल. याठिकाणी सर्वात आधी अर्ज भरा आणि नंतर तुमचा OTP टाका . आणि अर्जासह पुढे जा आणि तुम्हाला एसएमएसद्वारे माहिती पाठविली जाईल.
यानंतर तुम्हाला पैसे भरावी लागतील. त्यानंतर तुम्हाला ट्रॅव्हल परमिट मिळेल, जे तुम्ही डाऊनलोड करु शकता. त्याचप्रमाणे तुम्ही ऑफलाईन रजिस्टेशन देखील करु शकता. 13 ते 75 वर्षे वयोगटातील व्यक्ती अमरनाथ यात्रेला जाऊ शकतात. त्याचप्रमाणे गर्भवती महिलांना प्रवास करण्याची परवानगी नाही.
जर तुम्ही ऑनलाईन नोंदणी केली तर तुम्हाला 100 ते 220 रुपये खर्च करावे लागतील. हेलिकॉप्टरच्या बुकिंगसाठी 13,000 रुपये मोजावे लागतील
हे देखील वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






