anglo उर्दू हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण
एरंडोल-शिक्षक समाजाचे माराग्दर्शक असून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवण्याचे कार्य करावे असे आवाहन आमदार चिमणराव पाटील यांनी केले.अंजुमन ए इस्लाम ट्रस्ट संचालित anglo उर्दू हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अधिकारी व पदाधिका-यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते.जळगावचे माजी महापौर तथा इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष करीम सालार अध्यक्षस्थानी होते.भाजपचे जनजाती क्षेत्राचे प्रमुख advt.किशोर काळकर,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस एजाज मलिक,कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन,माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य आनंदा चौधरी (भगत) प्रमुख पाहुणे होते.
यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारामुळे त्याना प्रोत्साहन मिळत असल्याचे सांगितले.विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण करून कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन केले.शिक्षण हे वाघिणीचे दुध असून शिक्षणाशिवाय प्रगती होऊन शकत नाही असे सांगितले.विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा असे सांगितले.विद्यार्थ्यांनी स्वता:ची क्षमता लक्षात घेवून भविष्यकाळाचे नियोजन केल्यास यश निच्छित मिळत असल्याचे सांगितले.anglo उर्दू हायस्कूलला संरक्षक भिंत बांधून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.भाजपचे advt.किशोर काळकर यांनी शहरातील सर्वधर्मीय नागरिक आणि सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्र कुटुंब पद्धतीप्रमाणे राहत असल्याचे सांगितले.शहरात सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी पक्षभेद न मानता सर्वांच्या सुखदुख:त सहभागी होत असल्यामुळे एरांडोलाची वेगळी ओळख निर्माण झाली असल्याचे सांगितले.गावातील विकासाला प्राधान्य देण्याची भूमिका सर्वांची असल्यामुळे धार्मिक अथवा जातीय तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता सर्वांनी घेण्याची गरज असल्याचे सांगितले.anglo उर्दू हायस्कुलच्या विविध कामांसाठी भाजपने सहकार्य केल्याचे सांगूल खासदार उन्मेष पाटील यांच्या निधीतून शाळेला एक वर्ग बांधून देण्याचे जाहीर केले.
माजी महापौर करीम सालार यांनी हिजाब सारख्या धार्मिक तेढ निर्माण करण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी शिक्षणाला महत्व द्यावे असे आवाहन केले.मुली शिकल्या तर पुढील पिढी शिक्षित होत असते.प्रत्येक क्षेत्रात मुलीनी यश प्राप्त करून आपल्या कार्याचा ठसा उमटवला असल्याचे सांगितले.यावेळी संस्थेच्यावतीने पालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे,पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव,प्रा.शिवाजीराव अहिरराव,शकुंतला अहिरराव,गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज शेख,डॉ.मुकेश चौधरी,सकाळचे बातमीदार आल्हाद जोशी,मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संजय चौधरी यांचेसह शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.संस्थेचे सचिव शकीलोद्दिन शेख यांनी प्रास्ताविक केले.सलीम शेख यांनी सुत्रसंचलन केले.उपाध्यक्ष जाकीर हुसेन साबीरअली यांनी आभार मानले.
कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन,समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन,माजी उपनगराध्यक्ष अशोक चौधरी,शिवसेनेचे तालुकाप्रमुख वासुदेव पाटील,नितीन बिर्ला,जावेदमुजावर,निवृत्त तहसीलदार अरुण माळी,पी.जी.चौधरी यांचेसह विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष जहिरोद्दिन शेख,सहसचिव अकिल जहीरोद्दिन शेख,कोशाध्यक्ष शेख रहीम शेख शफी,संचालक नबी शेख,शेख हुसेन शेख ईसा,कमरअली सय्यद,लतीफ शेख,शकील नबी बागवान,शेख इस्माईल शेख हाशम,एजाज अहमद,प्राचार्य अयाजोद्दिन शेख यांचेसह संचालक व शिक्षकांनी सहकार्य केले.