जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
अचानक धनलाभ संभवतो. बौद्धिक दिमाख दाखवाल. मित्रांशी मतभेद संभवतात. काही गोष्टी अचानक घडतील. मानसिक ताणतणाव जाणवेल.
वृषभ :-
जोडीदाराच्या प्रेमळ स्वभावाची जाणीव होईल. उत्तम वैवाहिक सौख्य राहील. दिवस शांततेत जाईल. घरात तुमचा दबदबा राहील. संपर्कातील लोकांची मदत मिळेल.
मिथुन :-
उगाच चीडचीड करू नये. क्षुल्लक गोष्टी फार मनावर घेऊ नका. आत्मविश्वास सोडू नका. उष्णतेचा त्रास जाणवेल. हाताखालील लोक विश्वासू मिळतील.
कर्क :-
जुनी इच्छा पूर्ण होईल. कमिशनमधून फायदा होईल. कामात कल्पकता दाखवाल. व्यवहारात चोख राहाल. चांगला व्यावसायिक लाभ होईल.
सिंह :-
प्रवासाची आवड पूर्ण होईल. शिस्तीचे धोरण ठेवाल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. हातून चांगले लिखाण होईल. बौद्धिक छंद जोपासाल.
कन्या :-
बुद्धीला ताण द्यावा लागेल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. कफाचा त्रास जाणवेल. भावंडांना मदत कराल. प्रवासात काळजी घ्यावी.
तूळ :-
चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. नातेवाईकांशी दुरावा वाढू शकतो. घरातील वातावरण आनंदी राहील. व्यापारी वर्गाने नवीन योजना आखाव्यात. घरगुती वस्तू खरेदी कराल.
वृश्चिक :-
आपल्या मतावरच आग्रही राहाल. तुमचा दबदबा वाढेल. उत्तम कार्यकुशलता दाखवाल. हातातील अधिकार वापराल. मानापमानाला सामोरे जाल.
धनू :-
मानसिक त्रासाला बळी पडू नका. आवक-जावक यांचे योग्य नियोजन करावे. जवळचा प्रवास सावधानतेने करावा. फार काळजी करत बसू नका. भावंडांशी किरकोळ मतभेद संभवतात.
मकर :-
आशावादी दृष्टिकोन ठेवावा. सामाजिक दर्जा सुधारेल. तुमच्याकडील अधिकाराची जाणीव ठेवावी. बोलताना योग्य तेच शब्द वापरावेत. अनावश्यक खर्च टाळावा.
कुंभ :-
उगाच चीडचीड करू नका. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. आध्यात्मिक बळ वाढवावे. कामात स्थैर्य येईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील.
मीन :-
चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका. घरातील जबाबदारी उचलाल. इतरांचे कौतुक कराल. कलेची आवड जोपासाल. मनाजोगी खरेदी केले जाईल.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






