माजलगाव :- गोळीबारात हत्या झालेला उत्तर प्रदेशच खासदार आणि गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांच्या बॅनरमुळे बीड जिल्ह्यातील माजलगावात एकच खळबळ उडाली.शर्ट लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये अतिक आणि अश्रफ या दोघा भावांना शहीद असे संबोधण्यात आले होते. भर चौकात हे बॅनर लावल्याने एकच गोंधळ उडाला. माजलगाव पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने कारवाईचा बडगा उगारला. पोलिसांनी हे बॅनर तात्काळ काढून टाकत या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
मंगळवारी सकाळी माजलगाव शहरातील डॉ. आंबेडकर चौकात अतीक व अश्रफ भावांचे शहिद म्हणून असल्याचे बॅनर झळकत होते. गँगस्टर अतिक अहमद व त्याचा भाऊ अश्रफ या दोघांची दोन दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दोघांच्या हत्येचा निषेध करत ते शहीद झाले असल्याचा उल्लेख या बॅनरमध्ये करण्यात आला होता. या बॅनरवर त्यांना स्वर्गात जागा मिळावी, असे लिहिले होते. या बॅनर बाजीची शहरभरात चर्चा सुरु झाली.
बजरंग दलाने या संदर्भात निवेदन देऊन निषेध केला. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी देखील रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले. बॅनरमुळे शहरातील वातावरण बिघडू नये हे लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ आणि नगर परिषद प्रशासनाने सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हे बॅनर काढून घेतले. याप्रकरणी गेवराई उपविभागीय पोलिस अधिकारी राठोडे चौकशीसाठी दाखल झाले.
पोलिसांनी तातडीने कारवाईचा बडगा उगारत केले दोघांना अटक
हे देखील वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






